10 लाखांहून कमी किंमतीत Luxury Sedan Car! एका लीटरमध्ये 22 Km रेंज; कंपनीकडूनही विशेष सूट

Swapnil Ghangale Thu, 14 Sep 2023-4:22 pm,

सध्या हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाड्यांचा ट्रेड दिसत असला तरी सेडान कार्सची मागणी कमी झालेली नाही. दर्जा आणि क्लास या 2 गोष्टींसाठी सेडान कार्स ओळखल्या जातात.

सेडान कार्स रस्त्यावर धावताना अनेकजण आवर्जून वळून वळून पाहतात. या गाड्यांमधील कम्पर्ट हा अगदी अनमॅच असतो असं म्हणतात. सेडन गाड्या या लांबच्या प्रवासासाठी तसेच शहरात रोजच्या वापरासाठीही उत्तम मानल्या जातात.

लक्झरी सेगमेंटमधील सेडान कार्समध्ये अनेक भन्नाट फिचर्सही हल्ली पाहायला मिळतात. मात्र यामुळेच या कार्सची किंमतही सर्वसामान्यांना फार अधिक वाटते. या कार सर्वांनाच परवडत नाहीत. मात्र बाजारामध्ये अशी एक सेडान कार आहे ही भन्नाट फिचर्स आणि उत्तम हायब्रिड तंत्रज्ञानाचा योग्य मिलाफ आहे. 

या सेडन कारचं मायलेज आणि फिचर्सही कोणत्याही हॅचबॅक कारला लाजवतील असेच आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या कारची किंमत 10 लाखांहूनही कमी आहे. त्यातही या कंपनीने कारवर विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार कोणती आहे आणि तिचे फिचर्स कसे आहेत पाहूयात...

एवढा वेळ तुम्ही ज्या कारबद्दल वाचत आहात ती कार मारुती सुझुकी सियाज. कंपनीने 19 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच अजून 5 दिवस या कारवर भन्नाट ऑफर दिली आहे. पुढील 5 दिवस या कारवर कंपनीकडून 48 हजारांची विशेष सूट दिली जाणार आहे. ही सूट रोख रक्कमेमधील सूट आणि एक्सचेंज बोनसच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 

सियाजमध्ये कंपनीने 1.5 लीटरचं सीरीज पेट्रोल इंजन देण्यात आलं आहे. हे इंजिन 103 बीएचपीची पॉवर आणि 138 एनएम टॉर्क निर्माण करतं. ही कार माइल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसहीत उपलब्ध असल्याने कारचं मायलेज फारच उत्तम आहे. 

सियाज 22 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. 5 सीटर सियाज 9 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्स देण्यात आलं आहे.

सियाजच्या मेंटेनन्सचा खर्च हा फार कमी आहे. सामान्य सर्व्हिसिंगसाठी 5 हजारांहूनही कमी खर्च या गाडीला येतो. म्हणजेच महिन्याला 500 रुपयांहूनही कमी खर्च या कारसाठी येतो. अर्थात याच नियमत सर्व्हिसिंग आणि स्पेअरपार्ट बदलण्याच्या खर्चाचा समावेश नाही. 

सियाजची किंमत ही कोणत्याही हॅचबॅक कार इतकीच आहे. सियाजचं बेस मॉडेल 9.30 लाखांना उपलब्ध आहे. 9.30 लाख ही या कारची एक्स शोरुम प्राइज आहे. 

सियाजचं टॉप एण्ड मॉडेल 12.45 लाखांच्या एक्स शोरुम प्राइजला उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीकडून दिली जाणारी सवलत लक्षात घेतल्यास पुढील पाच दिवस ही कार 12 लाखांच्या आसपास उपलब्ध असेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link