Chaitra Navratri 2023 : आजपासून सुरु झालेल्या चैत्र नवरात्रीत घडणार 9 दुर्मिळ योगायोग! `हे` उपाय केल्यास होणार आर्थिक फायदा

Wed, 22 Mar 2023-10:02 am,

शनि आणि मंगळ मकर राशीत असणार आहे. तर रवि पुष्य नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग जुळून येतं आहे. याशिवाय मीन राशीत सूर्य-बुध संयोगाने बुधादित्य योग तयार होतो आहे. हा योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

नवरात्रीच्या काळात घर स्वच्छ ठेवा आणि घरात गंगेचे पाणी शिंपडा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक प्रगती होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

नवरात्रीच्या दिवसात देवीसोबत गणपतीची पूजा आर्वजून करा. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल.

हिंदू धर्मात तुळशाला अत्यंत पवित्र मानलं जातं. नवरात्रीमध्ये घरामध्ये तुळशीचं रोप लावा.

नवरात्रीमध्ये कलश स्थापना म्हणजेच घटस्थापनेला महत्त्व आहे. असं केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा आणि आनंद राहतो.  

नवरात्रीच्या दिवशी पिठाचा गोळा तयार करुन वाहत्या पाण्यात अर्पण करा. असं केल्याने जीवनात समृद्धी येते, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात देवीच्या मंदिरात दररोज गोड पेय अर्पण करा. (वरील माहितीचा कोणताही पुरावा नसल्यामुळं ती केवळ सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link