सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; `अशी` करा बुकींग

Pravin Dabholkar Tue, 05 Dec 2023-7:13 am,

सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून महागाई कमी करणे हा सर्वांसमोरचा मोठा मुद्दा आहे.एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमती हा राजकीय चर्चेचा विषय आहे. 

1 डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नसली तरी लोक आधीच महागाईने हैराण आहेत.

आता घरगुती गॅस 21 रुपयांनी स्वस्त खरेदी करण्याचा पर्याय आहे. तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची थेट ऑफर मिळेल. 

गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि तुम्ही स्वस्त सिलिंडर कसा खरेदी करू शकता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. 

या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा.

या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.

येथे तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पर्याय मिळेल आणि तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची ऑफर मिळेल.

या प्रक्रियेत, तुम्ही घरी बसून गॅस सिलेंडर बुक करू शकता आणि तुम्हाला वेगळे कुठेही जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला प्रत्यक्ष पैसे भरण्याची गरज नाही.

तुम्ही घरबसल्या पेमेंट करू शकता आणि गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्तात मिळवू शकता.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link