LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

Mansi kshirsagar Wed, 01 May 2024-11:04 am,

सर्वसामान्यांना नव्या महिन्यातच थोडा दिलासा मिळाला आहे. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव कमी झाला आहे. तर एकीकडे बँकेच्या नियमही बदलले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहेत. आजपासून कोणते नियम बदलले जाणून घेऊया. 

दर महिन्याच्या पहिल्या दिवशीत तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरचे दर बदलतात. आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 19 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.  मुंबईत आता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा (Commercial LPG Cylinder) भाव 1698.50 रुपये झाला आहे.

1 मे 2024 रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले आहेत. देशातील काही राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात दर जैसे थे आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रती लिटर इतके आहे. 

 

यस बँकेत आता 10,000 रुपये मिनिमम बँलेन्स ठेवावा लागणार आहे. ही मर्यादा वेगवेगळ्या बचत खात्यांसाठी वेगळी असून आजपासून हा नियम लागू झाला आहे. 

1 मे पासून आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना डेबिट कार्डसाठी 200 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहेत. मात्र, ग्रामीण भागात 99 रुपये आहे. त्याशिवाय  1 मेपासून 25 पानांचे चेकबुक इश्यू करायचे झाल्यास त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक पेजवर ग्राहकांना 4 रुपये मोजावे लागणार आहेत.

जर तुम्ही IDFC फर्स्ट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. क्रेडिट कार्डने वीजेचे बील, गॅस किंवा इंटरनेटचे बिल भरत असाल आणि एक महिन्याची रक्कम 20,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. 1 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. 

तुम्ही IDFC फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड वापरत असल्यास १ मे पासून प्रत्येक तिमाहीत ४ ऐवजी फक्त दोन विनामूल्य लाउंज प्रवेश मिळेल

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link