डब्‍बू रतनानीच्या नव्या कॅलेंडरमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लचा बोल्ड अंदाज...

Wed, 17 Jan 2018-3:33 pm,

डब्बू रतनानीने कॅलेंडरच्या फोटोशूटसाठी २४ बॉलिवूड स्टार्सची निवड केली आहे. यात शाहरूख खान, काजोल, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांसारख्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्याचबरोबर अलीकडेच देशाला मिस वर्ल्डचा किताब पटकावून देणारी मानुषी छिल्लरही यात झळकणार आहे.   

यात टायगर श्रॉफ देखील एका अनोख्या अंदाजात दिसेल.

अय्यारी चित्रपटात झळकणारा अभिनेता सिद्धार्थ मल्‍होत्रा पुन्हा एकदा या कॅलेंडरवर दिसणार आहे.

त्याचबरोबर बबली गर्ल परिणीती चोप्रा देखील या कॅलेंडर फोटोशूटमध्ये सहभागी झाली आहे.

तर प्रभास सोबत साहो च्या शूटींगमध्ये व्यस्त असलेली श्रद्धा कपूर चौथ्यांदा या कॅलेंडरमध्ये आपली वर्णी लावणार आहे.

बच्चन परिवार देखील या कॅलेंडरचा एक भाग आहेत. अभिषेक बच्‍चन, ऐश्‍वर्या आणि अमिताभ बच्‍चनही या कॅलेंडरवर झळकणार आहेत.

गेल्या वर्षी राब्ता आणि बरेली की बर्फी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री कृति सेनन देखील या कॅलेंडरवर झळकेल. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link