Calendarमध्ये विद्या बालन, कृती सेनन आणि मानुषीचा बोल्ड अंदाज

Sat, 20 Jan 2018-6:03 pm,

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडरमध्ये अनेक सेलिब्रेटींनी बोल्ड पोज दिल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन, कृती सेनन आणि मिस वर्ल्ड मानूषी छिल्लर या वेगवेगळ्या अंदाजात पहायला मिळाल्या.

या सेलिब्रिटी कॅलेंडरमध्ये विद्या बालन खूपच सुंदर दिसत आहे. विद्याने आपला एक फोटोही सोशल मीडियात शेअर केला आहे.

या कॅलेंडर शूटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दिसत असलेली अभिनेत्री कृती सेनन आता टॉपलेस पोजमध्ये दिसत आहे.

'गोलमाल अगेन' सिनेमात दिसलेली अभिनेत्री परिणीती चोप्रा कॅलेंडरमध्ये अशा लूकमध्ये पहायला मिळाली.

'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'जुडवा २' सारखे सुपरहीट सिनेमा देणारा अभिनेता वरुण धवन या कॅलेंडर शूटमध्ये या लूकमध्ये दिसला.

यावर्षी कॅलेंडरमध्ये नवी एन्ट्री झाली आहे ती म्हणजे मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची. या कॅलेंडर शूटमध्ये दिसणारी मानुषी अशा लूकमध्ये यापूर्वी कधी दिसली नसेल.

सूट-बूट आणि ब्लॅक गॉगल घातलेल्या फरहान अख्तरची ही पोजही खूप जबरदस्त आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा या कॅलेंडरमध्ये जंटलमन अंदाजात दिसत आहे.

अभिनेता ह्रतिक रोशन या कॅलेंडरमध्ये पुन्हा एकदा चॉकलेट बॉयच्या लुकमध्ये दिसत आहे.

नेहमीप्रमाणे टायगर श्रॉफ या शूटमध्ये आपली फ्लेक्जिबिलिटी दाखवत असल्याचं पहायला मिळत आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

या सेलिब्रेटी कॅलेंडरमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही पहायला मिळणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link