PHOTO : देवानंदच्या प्रेमाचा शत्रू, वैजयंती मालासोबत होती हिट जोडी; 20 वर्षांपेक्षा लहान अभिनेत्रीशी केलं लग्न

Mon, 26 Feb 2024-1:57 pm,

नवाबांप्रमाणे खुर्चीवर बसलेला हा चिमुकला आपल्या काळात बॉलिवूडमधील राज्य करायचा. खोल डोळ आणि त्यात भावनांनी भरलेल्या आवाजाने तो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचा. 

नाव बदलून इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावणाऱ्या या अभिनेत्यामुळेच मधुबाला आणि देवानंदची प्रेमकहाणी अधुरी राहिली होती. 

अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत इतिहास घडवणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये काम करुन ट्रॅजेडी किंग अशी ओळख मिळवली आहे. आम्ही बोलतोय, ते दुसरं तिसरं कोणी नसून दिलीप कुमार यांच्याबद्दल बोलत आहोत. 

दिलीप कुमार यांचं खरं नाव युसूफ खान असं होतं. सुरैया आणि देवानंद हे एकमेकांना आवडायचं. असं म्हणतात की, देवानंद आणि सुरैय्याचं नातं दिलीप कुमार यांच्यामुळे तुटलं होतं. 

दिलीप कुमार आणि देवानंद यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. दिलीप कुमार यांनी आपलं प्रेम अनेक वेळा गमावलं. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम होतं. ते नातं तुटलं त्यानंतर वैजयंती माला यांच्याशी दिलीप कुमारचं नाव जोडल्या गेलं. 

त्यानंतर दिलीप कुमार यांनी 20 वर्ष लहान अभिनेत्री सायरा बानोशी लग्न केलं. दिलीप कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट आपल्याला दिले आहेत. 

दिलीप कुमार यांना पद्म श्री, पद्म भूषण आणि दादा साहेब फाळके असे अनेक नावाजलेले पुरस्कार मिळाले आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link