Fake Disability Certificate: दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी `असा` केला जातोय हॅकर्सचा वापर

Pravin Dabholkar Fri, 02 Aug 2024-3:36 pm,

Disability Certificate:दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.अहमदनगरमध्ये असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलंय.रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून 3 जणांनी अपंगाचे प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आलंय.

दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.अहमदनगरमध्ये असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलंय.रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून 3 जणांनी अपंगाचे प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आलंय.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिव्यांग आयुक्तांशी संपर्क केला असून, गुन्हा दाखल करण्याबाबत दिव्यांग आयुक्तांना पत्र लिहिलंय.दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळवलं जातं आणि हॅकर्सकडून कसं मिळवलं पाहुयात.

दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या संबंधित विभागाकडून तपासणी करून अहवाल शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागतो.

त्यानंतर वेबसाईटवरून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळते.

शासकीय रुग्णालयातून दिव्यांग अहवाल पाठवला जातो यासाठी वेबसाईटची लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडे असतो.

मात्र समोर आलेल्या तीन अपंग प्रमाणपत्र धारकांनी कुठलेही शासकीय रुग्णालयाचे अहवाल वेबसाईटवर न देता अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link