कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

Wed, 18 Oct 2023-10:28 pm,

कॉफी पिण्याची सवय ही आपल्या सर्वांनाच असते. त्यातून आपणही फार जास्त कॉफी-चहा प्रेमी आहोत. परंतु यानं आपलं वजन तर वाढत नाही ना? तुम्हाला माहितीये का यानं वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. 

सध्या आपली जीवनशैली ही झपाट्यानं बदलते आहे. त्यातून आपल्या समोरील आव्हानंही फार वाढू लागली आहेत. आपली जीवनशैलीही बदलू लागली आहे. 

सध्या आपल्याला समोर प्रश्न असतो तो म्हणजे आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो? कोणते पदार्थ खाल्ल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल. 

कॉफी ही सुद्धा वजन कमी करण्यास मदत करते. ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यात मदत करते. यात एन्टी ऑक्सिडंट्स असतात. 

दालचिनीची कॉफी प्यायल्यानंही वजन कमी होण्यात मदत होते. ही आपल्या शरीरातील फॅट्सही बर्न करते. मेटाबॉयलिझम वाढवते. मिशिगन जीवन विज्ञान युनिवर्सिटीच्या सर्व्हेतूनही हे समोर आलं आहे. 

टर्मरिक कॉफीमध्ये क्रक्यूमिन असते ज्यानं तुमचं वजन कमी करण्यास मदत होते. 

अतिरिक्त चहा कॉफीही पिऊ नका. त्यातून तुम्हाला काही त्रास असतील तर शक्यतो कॉफी पिणं टाळा. 

तुम्हीही योग्य तज्ञांचा सल्ला घेत कॉफीचा वापर करून आपलं वजन कमी करू शकता. परंतु लक्षात घ्या की कॉफीचे अतिरिक्त सेवनही घातक ठरू शकते. तेव्हा आपल्याला त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link