`दुनियादारी`चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

गायत्री हसबनीस Wed, 19 Jul 2023-2:17 pm,

अंकूश चौधरी - डीएसपी म्हणजे दिंगबर शंकर पाटील, दिग्याची भुमिका अंकूशनं केली होती. त्याच्या या भुमिकेला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसाद दिला होता. स्वप्नील जोशी म्हणजे श्रेयस तळवलकर यांची मैत्री या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. अंकूशचा मुलगाही आता मोठा झाला असून तो नानाविध चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो आहे. नुकताच त्याचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

वर्षा उसगांवकर - राणी मां म्हणजे स्वप्नील जोशीच्या आईची भुमिका वर्षा उसगांवकर यांनी केली होती. आज त्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 

सुशांत शेलार - सुशांत शेलारनं शिरीन म्हणजे सई ताम्हणकरच्या सख्ख्या भावाची भुमिका केली होती. सध्या सुशांत राजकारणातही सक्रिय असून तो विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. 

जितेंद्र जोशी - साई म्हणजे साईनाथ ही खलभुमिका जितेंद्र जोशीनं केली होती. त्याच्या या खलभुमिकेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे हा डायलॉगही खूप फेमस आहे. जितेंद्र जोशीला एक मुलगी आहे. काही दिवसांपुर्वी त्याचा 'गोदावरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

उर्मिला कोठारे - मिनाक्षी म्हणजेच मिनूची भुमिका अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं केली होती. श्रेयस तळवलकरच्या ती प्रेमात असते परंतु श्रेयसचे शिरीनवर प्रेम असते. उर्मिलाला जिजा नावाची गोड मुलगी आहे. तीही सध्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. 

रिचा पारियल्ली - अकूंश चौधरीच्या म्हणजेच दिग्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भुमिका तिनं केली होती. सध्या तिच्याबद्दल फारशी काही अपडेट नाही परंतु माहितीनुसार ती चित्रपटसृष्टीतून दूर आहे. 

स्वप्नील जोशी - स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय आहे. त्यामुळे त्याची चांगलीच क्रेझ आहे. त्यालाही दोन मुलं आहेत. स्वप्नील सध्या ओटीटी, चित्रपट आणि रिएलिटी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे सोबतच तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्यानं या चित्रपटात श्रेयस तळवलकर ही मुख्य भुमिका केली होती. 

सई ताम्हणकर - सई ताम्हणकरनं शिरीनची भुमिका केली होती. श्रेयस आणि शिरीनची लव्हस्टोरी आणि त्यांच्या मित्रांची गोष्ट म्हणजे हा चित्रपट. सई आज बॉलिवूडमध्येही पोहचली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link