70 च्या स्पीडने हवेत उडणारा अनोखा मासा; आपल्या महाराष्ट्रात सापडला होता दुर्मिळ सागरी जीव

हा मासा खरंच पक्षांसारखा उडतो का जाणून घेऊया...

| Aug 21, 2024, 23:14 PM IST

Flying Fish :  मासे पाण्याशिवाय राहू शकत नाही हे सर्व माहित आहे. मात्र, एक असा अनोखा मासा आहे जो पाण्यात बुडतो आणि हवेत उडतो. आपल्या महाराष्ट्रात पालघरमध्ये हा पाखरु मासा अर्थात फ्लाईंग फिश आढळून आला होता. जाणून घेऊया या अनोख्या माशाविषयी.

1/7

पालघरच्या मासेमाऱ्यांना उडणारा मासा सापडला होता. स्थानिक या माशाला पाखरु मासा म्हणून ओळखतात. 

2/7

या माशांचे पृष्ठपर आणि गुदपर शेपटीच्या अगदी जवळ असतात. वक्षपर विस्तृत व पातळ पडद्यांचे बनलेले असतात. काळपट रंगाच्या या वक्षपरांवर काही जातींमध्ये ठळक काळे ठिपके असतात. शरीरावर मध्यम आकाराचे चमकते चंदेरी खवले असतात. या माशाचं तोंड वर वळलेले असते, त्याचे डोळे मोठे असतात आणि वाताशय मोठा असतो. 

3/7

 कोकण किनारपट्टीवर आढळणाऱ्या या पाखरू माशाचे शास्त्रीय नाव ‘एक्झॉसीटस व्होलिटॅन्स’ असे आहे. एक्झॉसीटिडी कुळातील माशांचे शरीर 15-45 सेंमी लांब आणि दोन्ही टोकांना निमुळते असते. 

4/7

हा मासा त्याच्या बळकट शेपटीला रेटा देऊन पाण्याच्या पृष्ठभागावर उसळी मारून बाहेर झेप घेतो. हे मासे तासाला 70 किमी.वेगाने उडू शकतात आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून सुमारे 6 मी. उंच तरंगू शकतात.    

5/7

या माशाचे वक्षपर विस्तीर्ण व पडद्यांनी बनलेले असून ते पंखांप्रमाणे काम करतात. म्हणून तर या माशाला पाखरू मासा असंही म्हंटल जातं.

6/7

या माशाचं तोंड वर वळलेले असते, त्याचे डोळे मोठे असतात आणि वाताशय मोठा असतो. अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात हे मासे प्रामुख्याने आढळतात. खोल समुद्रात असणारे हे मासे  क्वचितच किना-यावर पाहायला मिळतात.

7/7

या ‘फ्लाईंग फिश’ माशाच्या जगभर 9 प्रजाती आणि 64 जाती आहेत. उष्ण प्रदेशातील समुद्रात हा मासा आढळून येतो.