PHOTO : 3 लग्न, अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा, अविवाहित बापाची एक लेक आज मोठी सुपरस्टार

Mon, 29 Jan 2024-3:47 pm,

या अभिनेत्याला त्याचा अभिनयामुळे भारत सरकारकडून 1971 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. 1947 मध्ये 'मिस मालिनी' चित्रपटातून या अभिनेत्याने या क्षेत्रात प्रवेश केला होता. या अभिनेत्याची जोडी पुष्पवल्लीसोबत हिट ठरली होती. 

 

आम्ही बोलतोय रेखाचे वडील जेमिनवी गणेश यांच्याबद्दल. जेमिनी यांचं अनेक महिलांसोबत संबंध असल्याने ते कायम वादात अडकले. प्रसिद्ध अभिनेत्री सावित्रीसोबतच्या अफेअरमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. पुष्षवल्लीशी लग्न करता त्यांना दोन मुली झाल्यात. 

 

जेमिनी यांचं रेखाची आई पुष्पवल्ली हिच्याशी लग्न करता नातं कायम राहिल. या अभिनेत्याला एकूण 7 मुली आणि एक मुलगा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी 1998 मध्ये ज्युलियाना एंड्रयूशी तिसरं लग्न केल्याच म्हटलं गेल आहे. 

 

रेखाचे वडील जेमिनी गणेशन यांनी त्यांच्या 'वाझकाई पडगू' या चरित्रात त्यांच्या नातेसंबंधांबद्दल लिहिलंय. त्यांना 'किंग ऑफ रोमान्स' म्हटलेलं आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांचं वैयक्तित आयुष्यावर परिणाम झाला असं त्यांचं म्हणं होतं. 

पुष्पावल्लीपासून त्यांना एक रेखा आणि दुसरी राधा झाली होती. रेखा बॉलिवूडची सुपरस्टार आहे. आजही तिच्या सौंदर्याने अनेक चाहते घायाळ होतात.

 

जेमिनी गणेशन यांच्याप्रमाणेच रेखाच्या वैयक्तिक आयुष्यानेही बरीच चर्चा होते. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, किरण कुमार, विनोद मेहरा, संजय दत्त यांसारख्या स्टार्ससोबतही रेखाचं नाव जोडल्या गेलं आहे. तिचंही वडिलांप्रमाणे वैवाहिक आयुष्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. 

रेखाचे वडील जेमिनी यांना खरी ओळख 'थाई उल्लम' चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली होती. 1954 मध्ये आलेल्या 'मनम पोला मांगल्यम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर त्यांना स्टार हा दर्जा मिळाला. 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केलंय. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link