फिफा वर्ल्डकप: फ्रान्स आणि क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी जिंकलं जगाचं मन

Tue, 17 Jul 2018-8:54 am,

फ्रान्सने रविवारी मॉस्कोमध्ये झालेल्या सामन्यात क्रोएशियाला 4-2 ने पराभूत करत 2018 चा फिफा वर्ल्डकप जिंकला. फ्रान्सने 20 वर्षानंतर वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. 1998 मध्ये फ्रान्सने पहिला वर्ल्डकप जिंकला होता. फ्रान्सच्या विजयानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रों यांनी विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं.

फायनलमध्ये आपल्या दोन्ही संघांचा विश्वास आणि उत्साह वाढवण्यासाठी फ्रान्स आणि क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष मैदानात उपस्थित होते. फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी ज्या प्रकारे टीमचा उत्साह वाढवला ते पाहून जगभरातील लोकांचं मन त्यांनी जिंकलं.

 

दोन्ही देशाच्या राष्ट्रध्यक्षांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जगभरातील खेळ प्रेमींसाठी एका खेळाप्रती असलेली ही भावना नक्कीच वेगळी होती.

 

भरपावसात जेव्हा खेळाडू पुरस्कार घेण्यासाठी आले तेव्हा क्रोएशिया आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी खेळाडूंची गळाभेट घेत त्यांचं कौतूक केलं. या दरम्यान कोलिंदा या भावूक झाल्या. त्यांना अश्रृ अनावर झाले. दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी दाखवलेल्या या खेळ भावनेची जगभरात चर्चा आहे.

क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंदा यांनी म्हटलं होतं की, त्या सामना पाहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून नाही तर क्रोएशिया टीमच्या फॅन म्हणून येणार आहेत.

दुसरीकडे क्रोएशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी पराभवानंतरही टीमचा उत्साह वाढवला आणि त्यांचं कौतूक केलं. वर्ल्डकप फुटबॉलच्या फायनलनंतर पावसाला सुरुवात झाली. पण पावसात देखील दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी उत्साह दाखवला.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रो यांनी फायनल सामन्यानंतर अनेकांचं मन जिंकलं.

 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी यांनी मॉस्कोमध्ये वर्ल्डकप फायनलचा सामना पाहिला. फ्रान्स टीमच्या विजयानंतर एलिसी पॅलेसमध्ये टीमचं भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे.

2006 मध्ये दुसऱ्यांदा फ्रान्स फायनलमध्ये पोहोचली होती. पण इटली विरुद्ध वर्ल्डकप गमावल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र फ्रान्सने विजय मिळवला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link