Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...

गायत्री हसबनीस Sat, 05 Aug 2023-7:17 pm,

सलमान खान आणि संगीता बिजलानी - आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकेकाळी सलमान खान आणि संगीता बिजलानी हे रिलेशनशिपमध्ये होते. एवढेच नव्हे तर त्यांचे लग्नही होणार होते. मध्यंतरी 'कॉफी विथ करण' या शोमधून सलमाननं सांगितले होते की त्यांच्या दोघांच्या लग्नपत्रिकाही छापल्या होत्या परंतु त्यांचे लग्न काही होऊ शकले नाही. पण आज ते दोघं चांगले मित्र आहेत. नुकताच सलमान खानचा वाढदिवस पार पडला होता तेव्हा संगीतानं विशेष हजेरी लावली होती तेव्हा सलमाननं तिच्या कपाळाचे चुंबन घेतले होते. त्यावेळी आपल्याला प्रचिती आलीच आहे की ते दोघं अजूनही किती चांगले मित्र आहेत. 

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण - बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या आणि सलमाननंतर सर्वाधिक गाजलेले प्रेमप्रकरण हे कुणाचे असेल तर ते म्हणजे दीपिका आणि रणबीरचे. त्या दोघांच्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा होती. त्यातून आता ते दोघंही त्यांच्या संसारात आनंदी आहेत. आताही ते दोघं चांगले मित्र आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचा नवा एकत्र चित्रपटही येणार आहे किंबहुना ब्रेकअपनंतर त्यांनी दोन चित्रपट हे एकत्र केले होते. त्यातील एका चित्रपटाला नुकतीच 10 वर्षे पुर्ण झाली तेव्हा ते एकत्र जमले होते. 

सिद्धार्थ मल्होत्रा अणि आलिया भट्ट - 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून या दोघांनी एकत्र सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांच्या अफेअरच्याही भरपरू चर्चा होती. परंतु आता त्यांचे ब्रेकअप झालेले असून ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपल्या निवडलेल्या लाईफ पार्टनरसोबत ते सुखी आहेत. 

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी - अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्याही अफेअरची चर्चा होती. परंतु आता ते चांगले मित्र आहेत. 

सलमान खान आणि कैटरीना कैफ - या दोघांनीही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. सोबतच त्यांच्या अफेअरच्याही चर्चां रंगल्या होत्या. परंतु आज ते दोघंही चांगले मित्र आहेत. 

अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह - 'बॅन्ड बाजा बारात' या चित्रपटातून त्यांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्याही चर्चा होत्या. परंतु आता ते दोघंही खूप चांगले मित्र आहेत. 

करीना कपूर आणि शाहिद कपूर - करीना आणि शाहीदच्या ब्रेकअपची अद्यापही चर्चा रंगते. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, ते दोघंही चांगले मित्र आहेत. 

मलायका अरोरा आणि अरबाज खान - मलायका आणि अरबाज हे विभिक्त झालेले आहेत. परंतु आजही ते फार चांगले मित्र आहेत. 

 

ऋतिक रोशन आणि सुझॅन खान - 2014 साली हे दोघंही विभक्त झाले परंतु ते अनेकदा डिनरला किंवा फॅमिली फंग्शनला एकत्र भेटतात. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link