दिलासा! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता 600 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडरचे; नवे दर पाहूनच घ्या

Wed, 04 Oct 2023-4:10 pm,

सातत्यानं केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयात आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. 4 ऑक्टोबर रोजी मोदी कॅबिनेटच्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळं याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. 

 

कॅबिनेटच्या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान आता 200 रुपयांवरून वाढून 300 रुपये करण्यात आलं आहे. यापूर्वी ओनम आणि रक्षाबंधनपूर्वी कॅबिनेटनं असाच एक निर्णय घेतला होता. ज्यावेळी एलपीजीचे दर 200 रुपयांनी कमी करण्यात आले होते. ज्यानंतर आता पुन्हा एकदा असाच एक दिलासादायक निर्णय केंद्रानं घेतला आहे. 

 

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करत या निर्णयाबाबतची माहिती दिली. जिथं त्यांनी सिलिंडरचे दर 1100 रुपयांवरून आता 900 रुपयांवर आल्याचं सांगितलं. 

 

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलिंडर 700 रुपयांना मिळत होता. आता 900 रुपयांच्या सिलिंडरवर 300 रुपयांचं अनुदान मिळाल्यानंतर सिलिंदरचे दर 600 रुपयांवर पोहोचले आहेत. 

 

दिल्लीमध्ये उज्ज्वला लाभार्थी सध्या 14.2 किलोग्राम सिलिंडरसाठी 703 रुपये देतात. पण, या सिलिंडरचा बाजारभाव मात्र 903 रुपये इतरा आहे. केंद्राच्या निर्णयानं हे दर 603 रुपयांवर उतरले आहेत. 

 

थोडक्यात केंद्राच्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना आणि त्यातूनही उज्ज्वया योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा लाभ घेणं शक्य होणार आहे. 

 

कॅबिनेटच्या या बैठकीत फक्त सिलिंडरचे दरच नव्हे कर इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिथं वन देवताच्या नावे तेलंगणामध्ये आदिवासी विश्वविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link