दहावीनंतर टॉप 5 सरकारी स्कॉलरशिप, दर महिन्याला मिळेल 3 हजारपर्यंत रक्कम!

Pravin Dabholkar Tue, 28 May 2024-4:18 pm,

10th Pass Scholarships: दहावी परीक्षांचे निकाल लागले आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी करिअरच्या पुढील वाटा शोधू लागले आहेत.  विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च अभ्यासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सीबीएससी आणि आयसीएसई या राज्य मंडळांद्वारे शिष्यवृत्ती योजना चालवल्या जातात. 

गुणवंत आणि मेहनती विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तींमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे त्यांना चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास मदत मिळते. अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसते, त्यामुळे ते या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत.दरम्यान केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींविषयी जाणून घेऊया. 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसोर्स अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT द्वारे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम चालवला जातो. दोन टप्प्यांत चाचणी घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते. 

पहिल्या टप्प्यात ही चाचणी राज्याच्या शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण विभागामार्फत घेतली जाते. तर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा आयोजित केली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.  एनसीईआरटीची अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर याचा तपशील देण्यात आला आहे.

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE द्वारे सिंगल गर्ल चाइल्ड मेरिट स्कॉलरशिप योजना चालवली जाते. पालकांची एकुलत्या एक मुलांसाठी हा शिष्यवृत्ती कार्यक्रम चालवला जातो.  CBSE सिंगल गर्ल चाइल्ड मेरिट स्कॉलरशिप साठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये 500 शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. 

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. काही कारणांमुळे ती बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 10वी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात. 

या शिष्यवृत्ती कार्यक्रमात मुलांना दरमहा 2,500 रुपये आणि मुलींना 3,000 रुपये दिले जातात. यासाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट Scholarships.gov.in वर अर्ज करावा लागेल. 

नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत दिली जाते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी अर्ज करू शकतात. यामध्ये उमेदवारांची निवड चाचणीद्वारे केली जाते. 

परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल. यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट scholarships.gov.in.ला भेट देऊन अर्ज केला जाऊ शकतो.

अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना भारताच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 2006 मध्ये जाहीर केली होती. अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. 

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देता याव्यात, उच्च शिक्षणात त्यांचा प्रवेश संख्या वाढून त्यांची रोजगारक्षमता वाढावी यासाठी ही योजना आहे. अधिकृत वेबसाइट- minorityaffairs.gov.in वर याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link