डोळे दिपवणारं सौंदर्य, अभियांत्रिकीचा चमत्कार; सुदर्शन सेतुमध्ये काय आहे विशेष?

Pravin Dabholkar Sun, 25 Feb 2024-9:31 am,

Sudarshan Setu: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्वारका आणि भेत द्वारका बेटांना जोडणाऱ्या अत्याधुनिक सुदर्शन सेतूचे उद्घाटन करणार आहेत. हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे.

सुदर्शन सेतू आपल्या विविध वैशिष्ट्यांसाठी जगभरात ओळखला जाणार आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

सुदर्शन सेतू पुलाच्या उद्घाटनामुळे या मार्गावरून भाविकांना सहज प्रवास करता येणार आहे. द्वारका आणि भेत : द्वारकेला जाणाऱ्या प्रवाशांना या भक्तिमार्गावर अनेक चमत्कारीक अनुभव येणार आहेत.

सुदर्शन सेतूची मागणी अनेक दिवसांपासून होती. हा केबल पूल बांधण्यासाठी एकूण 980 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तारांवर बांधलेला हा पूल देशातील सर्वात सुंदर केबल ब्रिज ठरला आहे.

हा पूल सुमारे 980 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा पूल सुमारे 2.32 किलोमीटर लांब आहे. आता हा देशातील सर्वात लांब केबल आधारित पूल बनला आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमांनी सजवलेले फूटपाथ आहेत.

विशेष म्हणजे फूटपाथच्या वरच्या भागात सोलर पॅनल बसवण्यात आले असून, त्यातून एक मेगावाट वीजनिर्मिती होते.

पूल बांधण्यापूर्वी भेत द्वारकेला यात्रेसाठी जाणाऱ्या लोकांना बोटींवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. हा प्रकल्प कार्यक्षम अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणून गौरवला जात आहे.

देवभूमी द्वारकेतील पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link