PHOTO : 9 वर्ष मोठ्या मराठी अभिनेत्याशी लग्न, 15 व्या वर्षी बिग बींसोबत अभिनयाचा प्रवासाला सुरुवात, आज अभिनेत्री आहे कोट्याधीश

नेहा चौधरी Mon, 05 Aug 2024-11:59 am,

जेनेलिया सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून तिने वयाच्या 15 व्या वर्षी इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. जेनेलियाने अमिताभ बच्चनसोबत एका जाहिरातीत झळकली होती आणि त्यानंतर जेनेलिया रातोरात स्टार झाली. 

यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी जेनेलियाने फिल्मी दुनियेत एन्ट्री केली. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रितेश देशमुखचाही हा डेब्यू चित्रपट होता. 

दोघेही 18 वर्षांपासून एकमेकांसोबत असून 9 वर्ष मोठ्या राजकीय घरातील लेकासोबत 9 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जिनेलियाने लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. 

दोघांची पहिली भेट विमानतळावर झाली होती. रितेशला भेटण्यापूर्वी जेनेलियाच्या मनात अभिनेत्याची पूर्णपणे वेगळी प्रतिमा होती. रितेश राजकीय कुटुंबातील असल्याने रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता.  त्यामुळे तो गर्विष्ठ असू शकतात असं तिला वाटलं होतं. पण जेव्हा त्यांनी 'तुझे मेरी कसम' चित्रपटात एकत्र काम केलं तेव्हा त्यांना कळलं की रितेश देशमुख तसा अजिबात नाही. तो एक चांगला माणूस आहे. 

त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की ते एकमेकांना डेट करू लागले. जवळपास 9 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2014 मध्ये जेनेलियाने एका मुलाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव रायन ठेवलंय आणि आज त्यांना दोन मुलं आहेत. 

जेनेलियाच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने अपोस्टोलिक कार्मेल हायस्कूल, वांद्रेमध्ये शिक्षण घेतलंय. यानंतर तिने सेंट अँड्र्यू कॉलेजमधून पदवी ग्रहण केलीय. जेनेलियाला वाटलं की MNC मध्ये काम करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, पण नशिबाने तिला चित्रपटसृष्टीत आणलं. जेनेलिया राज्यस्तरीय क्रीडापटू राहिली असून राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडूही आहे. 

तिच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार, जेनेलिया एका चित्रपटासाठी 1 ते 3 कोटी रुपये मानधन घेते. तर जेनेलिया जवळपास 42 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकिण आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link