एवढा मोठा भोपळा...; ज्या भाजीसाठी नाकं मुरडता त्याचे फायदे पाहून आजच खायला सुरुवात कराल

Wed, 25 Jan 2023-2:50 pm,

भोपळ्यामध्ये Vitamin E मोठ्या प्रमाणात असतं. वाढत्या वयाची चिन्हं दिसू न देण्यासाठी अनेकजण भोपळा खातात. त्वचेच्या सौंदर्यासाठीसुद्धा भोपळ्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाण्याला अनेकजण प्राधान्य देतात. युव्ही रेडिएशन आणि प्रदूषणापासून भोपळा त्वचेचं संरक्षण करतो. 

भोपळ्यामध्ये असणाऱ्या 'विटामिन सी'मुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विविध प्रकारचे संसर्ग आजारपण दूर ठेवण्यासाठी हा घटक फायदेशीर ठरतो. 

भोपळ्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण सर्वाधिक असतं. यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो. थोडक्यात हृदयविकाराचा धोका कमी होतो. 

भोपळ्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अतिशय कमी असतं, तर यामध्ये असणारे तंतुमय घटक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठीसुद्धा भोपळा खाणं फायद्याचं ठरतं. यामध्ये असणारा विटामीन A हा घटक इथं तुमची मदत करतो. वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार यामुळं दूर राहतात. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link