लठ्ठपणापेक्षा भयंकर आहे सडपातळ असणे, `या` पाच आजारांचा असतो सर्वाधिक धोका

Mansi kshirsagar Sun, 13 Aug 2023-7:28 pm,

 काही जणांनी थोडंस जरी खाल्लं तरी लठ्ठपणा वाढतो मात्र काही जणांनी कितीही खाल्लं तरी त्यांच्या शरीराला लागत नाही. त्यांचे वजनही गरजेपेक्षा कमी असते आणि हे शरीरासाठी जास्त हानिकारक आहे. अतिप्रमाणात सडपातळ असणे धोकादायक ठरु शकते. या स्थितीत पाच गंभीर आजारांचा धोका संभवतो. अशावेळी योग्य वजन किती असावे, हे जाणून घेऊया. 

 बॉडी मास इंडेक्स हे एक शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. किलोग्रॅम मधील वजनाला मीटर मधील उंचीच्या वर्गाने भागले असता बॉडी मास इंडेक्स कळतो. १८ ते २५ हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स आहे. २५ ते ३० बॉडी मास इंडेक्सला वाढलेले वजन असे म्हणतात. १८ ते २५ पेक्षा कमी BMI असेल तर ते अंडरवेट आहेत असं म्हटलं जातं. 

गरजेपेक्षा जास्त सडपातळ असणे शरीरात पोषणाची कमतरता जाणवू लागते. या स्थीतीला कुपोषण असं म्हणतात. यात अशक्तपणा, थकवा येणे, केस गळती, कोरडी त्वचा, दात कमजोर होणे, यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

 वजन अति प्रणाणात कमी असल्यास रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. ज्यामुळं वातावरणात बदल झाल्यास व्हायरस, बॅक्टिरियासारखे विषाणूची लागण झाल्यास लवकर आजारी पडतात. 

न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस रोग होऊ शकतो. यामध्ये हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

 

कमी वजन असल्यास हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात, ज्यामुळे वंध्यत्व वाढू शकते. त्याच वेळी, यामुळे मुलांची वाढ थांबते आणि उंचीदेखील खुंटते. वजन वाढवण्यासाठी अंडी, केळी, फळे, भाज्या इत्यादींचा आहारात समावेश करा.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link