दारू प्यायल्यानंतर डोकेदुखी व मळमळ होतेय, हँगओव्हर नव्हे तर `या` आजाराचा धोका

Mansi kshirsagar Thu, 31 Aug 2023-7:31 pm,

अति प्रमाणात दारू पिणे शरीरासाठी हानिकार असते. मात्र, हल्ली पार्टीत दारू पिणे ट्रेंड आला आहे. न्यु इअर किंवा वाढदिवसाला हमखास अशा पार्ट्या केल्या जातात. इतकंच काय तर विकेंड ड्रिंकिंगदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी हँगओव्हरने संपूर्ण दिवस डोकं धरुन बसावं लागतं. 

युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने (UKHSA) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या अहवालानुसार, दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या डोकेदुखी आणि थकवासारख्या समस्या मेनिनजाइटिसची लक्षणे असू शकतात.

अहवालात Claire Wrightने म्हटलं आहे की, मेनिनजाइटिसमुळं अगदी काही तासांतच रुग्णांचा जीव जाऊ शकतो. याची सुरुवातीची लक्षणे ही अगदी हँगओव्हरप्रमाणेच दिसतात. 

 

 मेंदू आणि स्पायनल कोर्डच्या जवळ तीन मेंब्रेन आणि फ्लूइड असते. ज्यावेळी याला सूज येते त्याला मेनिनजाइटिस असं म्हटलं जातं. याचे मुख्य कारण हे बॅक्टेरिअल व व्हायरल इन्फेक्शन आहे. 

डोकेदुखी, ताप, झोप येणे, थकवा येणे, मळमळणे, उलटी येणे, भूक न लागणे, अशी सुरुवातीची लक्षणे दिसतात

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्यूज अँड अल्कोहोलिझमच्या मते, मद्यपान केल्यास थकवा, अशक्तपणा, तहान, डोकेदुखी, स्नायू दुखणे, मळमळ, पोटदुखी, प्रकाशाची संवेदनशीलता यांसारखी लक्षणे दिसतात.

मेनिनजाइटिसपासून बचाव करण्यासाठी लहानपणीच लसीकरण केले जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link