भारतातील शाहीविवाह, ५०० कोटींच्या विवाह सोहळ्यातील काही क्षण

Fri, 06 Mar 2020-9:26 am,

हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी याचा शाही विवाह.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी श्रीरामलू  यांची मुलगी रक्षिता आणि हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी याचा शाही विवाह सोहळा झाला. संजीव- रक्षिता यांच्या शाही विवाहाचीच सर्वत्र चर्चा होती. कारण या विवाह सोहळा तब्बल नऊ दिवस चालला. यासाठी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. (Pic Courtesy - Jaipal Sharma) 

हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी 

हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी याच्यासोबत रक्षिता विवाहबंधनात अडकली. रक्षिता आणि ललित संजीव रेड्डी याचा शाही विवाह.  बंगळुरूच्या पॅलेस ग्राऊंडमध्ये तब्बल ४० एकर जागेवर मुख्य विवाहसोहळा थाटात झाला. प्रत्येक विधीसाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित मंडप उभारण्यात आले होते. हा विवाहा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू  ठरला. 

भाजप नेते जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचे बंगळुरू पॅलेस ग्राऊंडमध्ये झालेल्या लग्नानंतर श्रीरामुलूच्या मुलीचे लग्न कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात महागड्या विवाहांपैकी एक मानले जात आहे.

२०१६ मध्ये बेल्लारीचेच खाणसम्राट, भाजप नेते जी जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचा विवाह सोहळाही असाच शाही झाला होता. त्या सोहळ्याला तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तेव्हा असाच थाट होता. 

पंतप्रधान मोदींना लग्नासाठी आमंत्रित केले गेले होते परंतु त्यांच्या आधीच्या व्यस्तता आणि व्यस्त वेळापत्रकांमुळे ते त्यास उपस्थित राहू शकले नाहीत.

हा शाही विवाह सोहळा तब्बल नऊ दिवस बेल्लारी आणि बंगळुरूमध्ये सुरु होता. ज्यामध्ये मुख्य सोहळा  काल ५ मार्चला झाला.

नववधु रक्षिता ही एमबीए पदवीधर आहे.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी श्रीरामुलू यांची मुलगी रक्षितने हैदराबादच्या ललित संजीव रेड्डीशी बेंगलुरूमध्ये भव्य विवाह केला.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांची मुलगी रक्षिता यांच्या लग्नासाठी झालेली गर्दी आणि महागडा विवाहसोहळा हाच शहरात चर्चेचा विषय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link