`गरिबीच्या भीतीने मी...`, एकेकाळी खायला पैसे नसणारा आज 7300 कोटींचा मालक! त्याचे विचार डोळ्यात अंजन घालणारे

Swapnil Ghangale Tue, 03 Sep 2024-1:37 pm,

असं म्हणतात की, यशस्वी व्यक्तीच्या यशामागील कष्ट दिसत नाहीत. या व्यक्तीबद्दल हे म्हणणं अगदी तंतोतंत लागू होतं. 7300 कोटींची संपत्ती जमा करणारी ही व्यक्ती आहे तरी कोण आणि तिने गरिबीबद्दल काय म्हटलंय पाहूयात...

तो आला... त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही... या अशा मोजक्या शब्दांमध्ये त्याचा आतापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करता येईल.

 

या व्यक्तीने आज आपल्या कौशल्याच्या जोरावर एकट्याने 7 हजार 300 कोटींचा डोलारा उभा केला आहे. मात्र त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा सध्या दिसतो तसा त्याच्या चकाचक आयुष्यासारखा हवाहवासा वाटणार नक्कीच नाही.

'2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. या यादीमध्ये पहिल्यादाच एक बड्या सेलिब्रिटीच्या नावाचा समावेश होता. हा सेलिब्रिटी सध्या 7 हजार 300 कोटींचा मालक आहे. 

 

आपण ज्या सेलिब्रिटीबद्दल बोलतोय तो कोण याचा अंदाज तुम्हाला आतापर्यंत आलाच असेल. होय बरोबर... आपण बोलतोय बॉलिवूडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानबद्दल!

 

आज लाखो दिलों की धडकन असलेल्या शाहरुखने त्याच्या आयुष्यात खडतर काळही पाहिला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने, "मी फार वाईट काळही पाहिला आहे," असं सांगितलं. यावेळेस त्याने मी लहान असताना आमच्याकडे माझ्या वडिलांवर औषधोपचार करण्याचे पैसेही नव्हते असं भावूक होत सांगितलेलं.

"मी अशा घरातून पुढे आलो आहे तिथे दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत होती. माझे आई वडील माझ्या शाळेची फी भरण्यासाठी चक्क सुट्टे पैसे गोळा करुन द्यायचे," असंही शाहरुखने सांगितलं. 

 

"मी एवढी गरिबी पाहिली असल्याने मी पैशांसाठी हाफहाफलेला नाही. एकाच वेळी माझ्याकडील सर्व पैसा खर्च करण्याची ताकद माझ्याकडे आहे," असंही शाहरुखने मुलाखतीत म्हटलेलं.

 

"गरिबीमुळे भीती, तणाव आणि कधीतरी अगदी डिप्रेशनच्या भावनाही मनात येतात. माझ्यामते किमान माझ्यासाठी तरी मी गरिबी म्हणजे अपयश असा विचार करतो," असं शाहरुख गरिबीबद्दल म्हणाला होता.

शाहरुखने घेतलेली त्याची दुसरी कार कर्जाचे हफ्ते न भरल्याने बँकेने जप्त केली होती. ही शाहरुखची आवडती काळ्या रंगाची जिप्सी होती. या घटनेमुळे शाहरुख फार निराश झाला होता.

 

शाहरुखची जप्त केलेली कार त्याला तब्बल एका वर्षाने 'त्रिशूल'च्या चित्रकरणादरम्यान परत मिळाली. हा शाहरुखसाठी फार खास क्षण होता.

 

"गरीबीच्या प्रेमात पडण्यासारखं काही नाही. त्याबद्दल रोमँटिक होण्याची गरज नाही. मी गरिबी पाहिली असल्याने हे सांगतोय," असं शाहरुखने तरुणांशी संवाद साधताना म्हटलं होतं. 

 

"गरिबीच्या भीतीने मी अनेक चित्रपटांना होकार दिला. क्रिएटीव्हीटीपेक्षा मी गरीबीच्या भीतीने हे निर्णय घेतले," असं शाहरुख म्हणाला. आपल्या करिअरच्या सुरुवातीला चित्रपट आपण केवळ पैशांसाठी केल्याचं शाहरुखने प्रांजलपणे मान्य केलं. 

मध्यंतरी अनेक चित्रपट अपयशी ठरल्यानंतर शाहरुख खान 'जवान' आणि 'पठाण'च्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं असून आता चाहत्यांना त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतिक्षा असतानाच त्याला श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत पहिलं स्थान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link