PHOTO : लग्नाच्या 11व्या दिवशी पतीला लागली गोळी, पतीच्या पहिल्या लग्नावेळी 1 वर्षांची होती अभिनेत्री; किशोर कुमारची `ही` मराठमोळी पत्नी कुठंय?

Wed, 12 Jun 2024-3:48 pm,

दोन लग्न होऊनही आजही ही अभिनेत्री एकाकी आयुष्य जगतंय. 70 आणि 80 च्या दशकातील या अभिनेत्रीने लहान वयातच शिखर गाठलं. सौंदर्य स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केलं. 

जाने क्यूँ लोग मोहब्बत किया हैं…, ढल गया दिन हो गई शाम… आणि हाय रे हाय, नींद नहीं आये ही गाणे आठवतात. याच गाण्याच्या अभिनेत्रीबद्दल आम्ही बोलत आहोत. लीना चंदावरकर किशोर कुमार यांची चौथी पत्नी होत्या. 

वयाच्या 25 व्या वर्षी लीना यांनी चित्रपटाला रामराम करुन लग्न केलं. पण लग्नाच्या 11 व्या दिवशी पतीला गोळ्या लागून मृत्यू झाला. त्यानंतर 20 वर्षांपेक्षा मोठ्या किशोर कुमार यांच्या प्रेमात पडल्या. 

लीना यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड इथल्या कोकणी मराठी कुटुंबात झाला. वडील लष्करी अधिकारी पण त्यांचा लहानपणापासून कल हा ग्लॅमर इंडस्ट्रीकडे होता. 

मॉडेलिंग करताना वयाच्या 18 व्या वर्षी अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्ये त्या झळकल्या. त्यानंतर त्यांना सुनील दत्त यांचा 'मसिहा' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण या चित्रपटाती शूटिंग थांबवण्यात आली. त्यानंतर सुनील दत्त यांनी मन का मीत या चित्रपटात घेतलं आणि त्या रातोरात स्टार झाल्यात. 

70 च्या दशकात, हेमा मालिनी आणि मुमताज या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री त्या एक होत्या. 10 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी राजेश खन्ना, दिलीप कुमार आमि जितेंद्रसोबत काम केलं. पण वयाच्या 25 व्या वर्षी सिद्धार्थ बांदोडकरसोबत अरेंज मॅरेज केलं. सिद्धार्थ हे प्रसिद्ध राजकीय घरण्यातील होते. लग्नाच्या 11व्या दिवशी बंदूक साफ करताना गोळी लागली. अथक प्रयत्न केले मात्र 11 महिन्यांनी सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला. 

पतीच्या मृत्यूनंतर लीना यांना घरच्यांचे टोमणे ऐकावे लागले. एकदा या टोमण्यांना कंटाळून त्यांनी आत्महत्याचा विचार केला. पण त्यांनी चित्रपटसृष्टीकडे आपली पाऊल वळवली. 

 

पतीच्या मृत्यूनंतर लीना यांना घरच्यांचे टोमणे ऐकावे लागले. एकदा या टोमण्यांना कंटाळून त्यांनी आत्महत्याचा विचार केला. पण त्यांनी चित्रपटसृष्टीकडे आपली पाऊल वळवली. 

दिलीप कुमारसोबत 'बैराग' चित्रपटात त्यांनी काम केलं. प्यार अजनबी है या चित्रपटात किशोर कुमार लीना या जवळ आल्यात. एकमेकांसोबत ते वेळ घालू लागले. पण त्यांच्या या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. कारण किशोर कुमार यांचं तीन लग्न झाले होते. दुसरं कारण ते लीनापेक्षा 20 वर्ष मोठे होते. 

लीनाच्या विरोध मोडण्यासाठी किशोर दा यांनी धारवाडमध्ये त्यांच्या घराबाहैर रोज बसून आंदोलन केलं होतं. विशेष म्हणजे जोरजोरात एक गाण गायचे.नफरत करने वालों के दिल में प्यार भर दूं. 

त्यानंतर 1980 मध्ये किशोर कुमार लीना चंदावकर यांनी लग्न केलं. खरं तर या लग्नाच्या एक वर्षापूर्वीच त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार लग्नाच्या वेळी लीना या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या. 

किशोर कुमारशी लग्न केल्यावर त्यांनी परत बॉलिवूड सोडलं. लग्नाच्या 7 वर्षांनंतर किशोर कुमार यांचं निधन झालं. आता लीना किशोर कुमार यांची तिसरी पत्नी रुमा गुहा यांचा मुलगा अमित कुमार आणि त्यांच्या पत्नीसोबत राहते. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link