ह्यूंदाईची नवी आय-20 कार लॉन्च

Sat, 05 May 2018-6:02 pm,

ह्यूंदाईने i20 ची नवी वेरिएंट लॉन्च केली आहे. i20 अॅक्टिवचा फेसलिफ्ट मॉडल ऑटो एक्सपो 2018 मध्ये सादर करण्यात आला होता. i20 अॅक्टिवमध्ये कंपनीने काही बदल केले आहेत.

i20 अॅक्टिवच्या रेडिएटर ग्रिलमध्ये कोणताच बदल नाही केला गेला आहे. ही ह्यूंदाईच्या इतर मॉडेलमध्ये वापरल्या गेलेल्या कॉस्केड ग्रिल सारखी नाही आहे. कारमध्ये फ्रंट फॉग लँपवर सिल्वर फिनिश देण्यात आली आहे. ब्लॅक रबर स्ट्रिप देखील यामध्ये देण्यात आली आहे. रिअर बंपरमध्ये कंपनीने कोणताच बदल केलेला नाही. कारमध्ये कंपनीने नव्या प्रकारच्या लाईट लावल्या आहेत.

कारमध्ये नवी टचस्क्रीन यूनिट आणि सीट फॅब्रिकवर हाउड-टुथ पॅटर्न देण्यात आलंय. इलाइट i20 मध्ये देखील कंपनीने हेच पॅटर्न दिलं होतं. हॅचबॅक i20 अॅक्टिव देखील यावरच आधारित आहे. केबिनमध्ये नवं इंफोटेनमेंट सिस्टम आहे. साइड एसी वेंट्स आणि गियर नॉबवर निळ्या रंगाची डॅश आहे.

कारमध्ये कंपनीने कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. यामध्ये 83hp पावरचं पेट्रोल इंजिन आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅनुअल गियर बॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय 1.4 लीटरचं इंजिन 90hp पावरचं आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गियर बॉक्स देण्यात आला आहे.

पेट्रोल व्हर्जनची Hyundai i20 Active चा फेसलिफ्ट मॉडलची किमंत 6.99 लाख रुपये आहे. याच्या टॉप वेरिएंटची किंमत 8.66 लाख रुपये आहे तर डिझेल वेरिएंटची किंमत 8.96 लाख रुपये ते 10.01 लाख रुपये पर्यंत असण्याची शक्यता आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link