IAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य

Surendra Gangan Sat, 28 Jan 2023-2:55 pm,

IAF Plane Crash : मध्य प्रदेशमधील मुरेनाजवळ दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. तर राजस्थानातील भरतपूर येथे हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले. सुखोई आणि मिराज या विमानांची धडक होऊन दोन्ही विमाने खाली कोसळली.  हवाई सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरुन उड्डाण केले होते. याबद्दल  शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना येथे सुखोई-30 (Sukhoi-30) आणि मिराज 2000 (Miraj 2000) विमाने कोसळली आहेत. सुखोई-30 आणि मिराज 2000 ने ग्वाल्हेर हवाई तळावरुन उड्डाण केले. इथे प्रशिक्षण सराव चालू होता. या अपघातात दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत.

सुखोई-30 आणि मिराज-2000 विमानांचा अपघात झाला. भरतपूरमध्ये कोसळलेल्या चार्टर्ड विमानाने आग्रा येथून उड्डाण केले होते. त्याचवेळी मोरेना येथे कोसळलेल्या विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे.

 या अपघातानंतर विमानाला आग लागली. या अपघातात विमानांचा चक्काचूर झाला आहे. या फायटर जेटने आग्रा येथून उड्डाण केले. भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेना जेट क्रॅशमध्ये दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय वायुसेनेची (IAF) दोन चार्टर्ड विमाने मुरैना, मध्यप्रदेशात आणि 1 चार्टर्ड विमान राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले. या अपघातात विमानांचा चक्काचूर झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानाचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर विमानाला आग लागली. या अपघातात विमानांचा चक्काचूर झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link