INDIA च्या सरकारमध्ये ठाकरे, सुळे थेट कॅबिनेटमध्ये असते; त्यांच्याकडे असती `ही` मंत्रालयं

Swapnil Ghangale Wed, 26 Jun 2024-9:53 am,

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलं आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सर्व खासदारांना खासदारकीची शपथ देण्यात आली.

 

मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात 'इंडिया आघाडीचं' सरकार स्थापन झालं असतं तर कोणाकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात आली असती? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? याच प्रश्नाचं उत्तर एआयच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. सध्या हे अस्तित्वात न आलेले इंडिया आघाडीचं मंत्रीमंडळ सोसल मीडियावरील एआय फोटोंमुळे चर्चेत आहे. त्यावरच नजर टाकूयात आणि पाहूयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर कोणती जबाबादारी देता आली असती. (येथून पुढील सर्व फोटो instagram/sahixd वरुन साभार)  

राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असं एआयचं म्हणणं आहे.

 

शशी थरुर यांच्याकडे परराष्ट्रमंत्रालयाची जबाबदारी सोपवता आली असती.

 

डी. के. शिवकुमार हे देशाचे रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री झाले असते.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गृहमंत्री झाले असते.

 

काँग्रेसच्या सचिन पायलेट यांच्याकडे नागरी उड्डायन मंत्रालय सोपवण्यात आलं असतं.

 

काँग्रेसच्या अभिषेक सिंघवींकडे कायदा आणि न्याय मंत्रालयाची जाबाबदारी दिली गेली असती. 

 

अखिलेश यादव यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देण्यात आलं असतं.

 

काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश रेल्वेमंत्री झाले असते.

 

तेजस्वी यादव यांच्याकडे संरक्षण मंत्रालय सोपवता आलं असतं.

 

अर्थमंत्रालयाचा कारभार दिपेंद्र हुड्डांनी पाहिला असता.

 

टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जींना युवा व क्रीडा मंत्रालय देता आलं असतं.

 

टीएमसीच्या युसूफ पठाणकडे अल्पसंख्यांकं मंत्रालय सोपवण्यात आलं असतं.

 

विशेष म्हणजे एआयनुसार प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीकडे शिक्षण मंत्रालय सोपवलं असतं असं एआयचं म्हणणं आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी कृषी व कृषी कल्याण मंत्रालय अधिक योग्य ठरलं असतं.

 

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडे महिला व बालविकास मंत्रालय सोपवता आलं असतं.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link