जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; ऑगस्टमध्ये कशी असेल परिस्थिती? IMD म्हणते, मराठवाड्यात...

Mansi kshirsagar Fri, 02 Aug 2024-1:00 pm,

राज्यात जुलै महिन्यात 138 टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतांश धरणे 90 टक्के भरली आहेत. नैर्ऋत्य मान्सूनच्या उर्वरित हंगामात (ऑगस्ट, सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज गुरुवारी जाहिर केला. यावेळी त्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. 

 

जुलैमध्ये राज्यासह देशभरात बहुतेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एकत्रितपणे सर्वसाधारण ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.

 

 महाराष्ट्रात आगामी दोन महिन्यांत एकत्रितपणे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र, ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. 

 येत्या आठ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहणार असून, त्यानंतरच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रातील ताम्हिणी येथे २५ जुलै रोजी नोंदला गेलेला ५६० मिलीमीटर पाऊस हा जुलैमध्ये देशातील सर्वोच्च्च पाऊस ठरला.

 

ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये प्रशांत महासागरात ला निनोची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये देशात पाऊस अधिक पडू शकतो.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link