आणखीन एक पराभव, World Test Championship भारत बाहेर?

Wed, 10 Feb 2021-1:28 pm,

भारत विरुद्ध इंग्लंड चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताच्या हातून सुटला. ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. उरलेले तिन्ही सामने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आणखीन एक पराभव भारतीय संघासाठी घातक ठरू शकतो. भारत आणखीन एका सामन्यात पराभव झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडेल. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना आणखीन अटीतटीचा झाला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला 227 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या पॉईंट टेबलमध्ये बरेच बदल झाले आहेत. मालिकेपूर्वी टेबलच्या वरच्या स्थानी पोहोचलेला टीम इंडिया पराभवानंतर आता चौथ्या स्थानावर आला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना संपल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये सर्व संघांची स्थिती कशी आहे ते पाहणार आहोत.

 

चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर जो रूट यांच्या संघाला मोठा फायदा झाला आहे. पहिला सामना खिशात घातल्यानंतर या संघाचं स्थान पॉइंट टेबलवरवर आलं आहे. तर भारत थेट चौथ्या स्थानवर पोहोचला आहे. इंग्लंड संघ 442 अंकांच्या मदतीनं पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जर इंग्लंड संघानं भारतीय संघाला उरलेल्या सामन्यात पराभूत केलं तर इंग्लंडला न्यूझिलंड विरुद्ध त्यांच्याच देशात अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेबाबत न्यूझीलंडच्या संघाला सध्या कोणतीही अडचण नाही. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर केन विल्यमसनच्या संघाने आधीच डब्ल्यूटीसी फायनल्ससाठी पात्रता मिळवली आहे. न्यूझिलंड सध्या 70 टक्के आणि 420 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या मालिकेमध्ये 2-1 असा पराभव आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा पुढे ढकलल्यानं ऑस्ट्रेलिया संघासाठी फारच अवघड आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेवर ऑस्ट्रेलियाचे भविष्य अवलंबून आहे. सध्या ऑस्ट्रेलिया 69.2 टक्क्यांसह 332 गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे. 

पहिल्या सामन्यात इग्लंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला आणखीन एक शेवटची संधी असणार आहे. WTC अंतिम सामन्यात पोहोचायचं असेल तर अंतिम सामन्यासाठी भारताला आता इंग्लंडचा 2-1 किंवा 3-1 असा पराभव करून मालिका जिंकावी लागणार आहे. इंग्लड विरुद्ध एक सामना पुन्हा एकदा पराभूत होणं भारतासाठी महागात पडू शकतं आणि भारत बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आता भारतीय संघासमोर तगडं आव्हान आहे. उर्वरीत 3 सामन्यांमध्ये भारताला 3-1 ने इंग्लंडचा पराभव करावा लागणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link