ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर `हे` 26 भारतीय खासदारपदी विराजमान

नेहा चौधरी Sat, 06 Jul 2024-10:19 am,

किअर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाला 412 जागांवर तर ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 121 जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत इंग्लंडच्या जनतेने भारतीय वंशांच्या नेत्यांवर खूप जास्त विश्वास दाखवलाय. 

ब्रिटनच्या निवडणुकीत 26 भारतीयांनी विजय झेंडा फडकवलाय. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट झाली आहे. 2019 मधील निवडणुकीत 15 भारतीयांनी विजय मिळवला होता. 

हाऊस ऑफ कॉमन्ससाठी मजूर पक्षाच्या तिकिटावर भारतीय वंशाचे बहुतेक नेते जिंकले आहेत. लेबर पार्टीची खासदार सीमा मल्होत्राने फेलथम आणि हेस्टन मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय. 

तर पूर्व खासदार कीथ वाझे यांची बहीण आणि गोव्याची मूळ भारतीय व्हॅलेरी वाझे लेबर पार्टीमधून वाल्सॉल आणि ब्लॉक्सविच मतदारसंघातून विजयी झाली आहे. 

मजूर पक्षातील आणखी एक खासदार याचं कनेक्शन बॉलिवूडशी आहे. कनिष्क नारायण या भारतीय वंशाच्या नेत्याने अलून केर्न्सचा पराभव करत विजय मिळवला आहे. नारायण यांचा जन्म बिहारमधील मुजफ्फरपूर झालाय. कनिष्क हा अभिनेत्री श्रेया नारायणचा भाऊ आहे. 

व्हॅलेरी वाझेसह लिसा नंदी, तनमजीत सिंग, नवेंदू मिश्रा, नादिया व्हिटोम, जस अथवाल, बेगी शंकर, सतवीर कौर, हरप्रीत उप्पल, वरिंदर जस, गुरिंदर जोसन, सोनिया कुमार, सुरीना ब्रॅकनब्रिज, किरीथ एन्टविसल, जीवन संदेर आणि सोजन जोसेफ हे विजयी झाले आहेत. 

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक हे उत्तर इंग्लंडमधून विजयी झाले आहेत. मात्र यंदा त्यांना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी मत मिळाले आहेत. 

कंझर्व्हेटिव्ह पक्षातून सुएला ब्रेव्हरमन, प्रीती पटेल, गगन मोहिंद्र, शिवानी राजा हे भारतीय वंशाचे नेते खासदारपदी विराजमान झाले आहेत. 

इतर पक्षांतून मुनिरा विल्सन आणि निगेल फराज हे दोन भारतीय विजय नोंदवण्यात यशस्वी ठरले आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link