`या` ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा

Mon, 21 Aug 2023-10:57 am,

तुम्हाला माहितीये या रेल्वे विभागातल सर्वाधिक प्राधान्य कोणत्या रेल्वेला दिलं जातं? जाणून आश्चर्य वाटेल, किंबहुना तुम्हाला ही बात कायमच लक्षात ठेवावी लागेल. कारण ही रेल्वेही तितकीच महत्त्वाची आहे.  

या रेल्वेविषयी जाणून घेण्याआधी रेल्वे विभागाविषयी थोडं जाणून घेऊया. कारण, दर दिवसागणिक या रेल्वे प्रवासात सातत्यानं काही बदल होताना दिसत आहेत. 

 

रेल्वे रुळांपासून रेल्वेगाड्यांपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. यामुळं प्रवाशांचा प्रवासही सुकर झाला. परिणामी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. 

 

याच रेल्वेकडून सर्व उत्पन्नगटातील प्रवाशांचा विचार केला जातो. ज्या धर्तीवर सर्वसामान्य रेल्वे, मेल, एक्स्प्रेसपासून अगदी Luxury सुविधा असणाऱ्या रेल्वेंचाही समावेश आहे

एक्स्प्रेस गाड्यांचा वेग पाहता बऱ्याचदा प्रवासी किमान वेळेत अपेक्षित स्थळी कसं पोहोचता येईल याचाच विचार करत राजधानी, शताब्दी किंवा इतर सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना प्राधान्य देतात. 

 

आश्चर्याची बाब म्हणजे या रेल्वेगाड्या कितीही जलद असल्या तरीही एक रेल्वे अशीही आहे जी रुळांवर येताच सुपरफास्ट रेल्वेगाड्या थांबवल्या जातात. अगदी प्रिमियम ट्रेनही यावेळी एका क्षणात थांबतात. 

भारतीय रेल्वे विभागातील या ट्रेनचं नाव आहे अॅक्सिडेंट रिलिफ मेडिकल इक्विपमेंट. रेल्वे अपघातांदरम्यान, वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ही रेल्वे सोडली जाते. घटनास्थळी तातडीनं पोहोचण्यासाठी या रेल्वेलाठी रुळ मोकळे ठेवले जातात. 

इतकंच नव्हे, तर देशाचे राष्ट्रपती जर रेल्वेनं प्रवास करत असतील तर, त्यांची रेल्वे पुढे जाऊ देण्यासाठीसुद्धा इतर रेल्वेगाड्या थांबवल्या जातात. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये मात्र राष्ट्रपतींचा रेल्वेप्रवास क्वचितच पाहायला मिळतो. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link