Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा नियम; तिकीट काढताना ही एक चूक अजिबात करु नका

Sat, 29 Jul 2023-12:27 pm,

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा नियम; तिकीट काढताना ही एक चूक अजिबात करु नका 

Indian Railway : रेल्वेच्या नव्या नियमाचा प्रत्येक प्रवाशाला फायदा होणार आहे. कारण, हा नियम आहे प्रवाशांच्या ट्रॅवल इंश्योरन्स संदर्भात. 

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाला निघणार असाल तर, प्रवास विमा नक्की काढा. हे तुम्ही तिकीट खरेदी करताना अगदी सहजपणे काढू शकता. 

 

IRCTC च्या ऑनलाईन पोर्टलवरून तिकीट खरेदी करताना तुमच्याकडे हा पर्याय उपलब्ध असतो. 

बरं हा प्रवास विमा काढण्यासाठी तुम्हाला फक्त 35 पैसेच भरावे लागतात. त्याऐवजी रेल्वे तुम्हाला 10 लाख रुपयांचा विमा देते. त्यामुळं तिकीट काढताना विमा न काढण्याची चूक अजिबातच करू नका. 

 

तिकीट बुक होताच तुम्हाला एक ईमेल आणि एक मेसेज येईल. जिथं एका डॉक्युमेंटमध्ये तुम्ही स्वत:बद्दल आणि नॉमिनीविषयीची माहिती देणं अपेक्षित असतं. 

 

रेल्वे विभागाकडून हा विमा काढल्यास दुर्दैवानं एखादा रेल्वे अपघात झाल्यास मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये (विम्याची 100 टक्के रक्कम), अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये आणि जखमी झाल्यास 7.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास रुग्णालयात उपचारासाठी 2 लाख रुपये असा परतावा दिला जातो. 

 

1 नोव्हेंबर 2021 पासून आयआरसीटीसीनं ही सेवा सुरु केली. ज्याचा लाभ आतापर्यंत अनेक प्रवाशांनी घेतला आहे. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link