Friendship Day Wishes in Marathi: तुझी माझी यारी... मैत्री म्हणजे सर्वस्व मानणाऱ्या प्रत्येकाला फ्रेंडशिप दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

दक्षता ठसाळे-घोसाळकर Tue, 30 Jul 2024-10:10 am,

मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे

 जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध

मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय  जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते

 कुठलंही नातं नसताना  आयुष्यभर साथ देते ती मैत्री 

 मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे  बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री

वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध… हॅपी फ्रेंडशिप डे!!!

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link