आयपीएल 2020: पहिल्या १० सामन्यांमधील आश्चर्यकारक कामगिरी

Tue, 29 Sep 2020-8:31 pm,

आयपीएल इतिहासाच्या 12 सीजनमध्ये सुपर ओव्हर सामन्यांची संख्या फक्त 9 होती. पण यावेळी लीगमध्ये अशी चुरस दिसून येत आहे. कारण पहिल्या 10 सामन्यांत 2 सुपर ओव्हर्स सामने झाले आहेत. दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ही सुपर ओव्हर झाली. (फोटो- बीसीसीआय / आयपीएल)

आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सामना जिंकण्यासाठी सर्वाधिक धावा करण्याचा 12 वर्षाचा विक्रमही मोडला गेला. राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 224 धावा करुन हा विक्रम मोडला. आयपीएल -2008 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध हैदराबादमध्ये 215 धावांचाराजस्थानचा विक्रम मोडला आहे. (फोटो- बीसीसी / आयपीएल)

आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा 2 शतक भारतीयांनी ठोकले आहेत. केएल राहुल (KL Rahul) ने 132 रन आणि मयंक अग्रवाल (Mayank Aggarwal) ने 106 रनची खेळी करत शतक ठोकले आहे. आयपीएल-2011 मध्ये पंजाबच्या पॉल वॉल्थेटी (Paul Valthaty) ने शतक ठोकलं होतं. त्यानंतर कोच्चीच्या विरुद्ध सीजनचं दुसरं शतक ठोकलं होतं. पण यंदा शतक ठोकणारे मयंक आणि राहुल दोघेही एकाच संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत. (फोटो BCC/IPL)

आयपीएलच्या 13 सीजनमध्ये तिसऱ्यांदा कोणता खेळाडू 99 रनवर आऊट झाला आहे. या सीजनमध्ये मुंबईचा ईशान किशन (Ishan Kishan) आयपीएल-2019 मध्ये दिल्लीचा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि आयपीएल-2013 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) याआधी 99 रनवर आऊट झाला आहे. (फोटो-BCC/IPL)

आयपीएल 2020 मध्ये राजस्थानने पंजाबच्या विरुद्ध सामना जिंकत शेवटच्या 5 ओव्हरमध्ये (4.3 ओव्हर) 86 रन केले होते. या सामन्यात शेवटच्या 5 ओव्हरमध्ये रनचा नवा रेकॉर्ड झाला होता. याआधी रन चेस करताना 5 ओव्हरमध्ये सर्वाधिक 77 रन करण्याचा रेकॉर्ड चेन्नईच्या नावावर होता. 2012 मध्ये चेन्नईने बंगळुरुच्या विरुद्ध हा सामना जिंकला होता. (फोटो-BCC/IPL)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link