ISS Speed : अवघ्या 90 मिनिटांत अख्ख्या पृथ्वीचा एक राऊंड, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा वेग नेमका किती?

Mon, 16 Sep 2024-6:48 pm,

इंटरनॅशल स्पेस स्टेशन (ISS) खाली पडणार असल्याचं सातत्यानं  म्हटलं जातंय. त्यांची अनेक कारणे आहेत. त्यातील वातावरणातील घर्षण आणि गुरुत्वाकर्षण महत्त्वाचे कारण आहे. पण आपल्याला घाबरण्याची गरज नाही कारण इंटरनॅशल स्पेस स्टेशन पृथ्वीवर येण्याची वेळ अजून आलेली नाही. 

या इंटरनॅशल स्पेस स्टेशनचा वेग 27,580 किलोमीटर प्रती तास आणि वजन आणि पृथ्वीचा वेग 1674 किमी प्रती तास आहे. 

इंटरनॅशल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून 370-460 किलोमीटर उंचीवर आहे. पण तिथे असलेल्या वातावरणाचा पातळ थर त्याला हळूहळू खाली खेचत आहे. 

आता ISS सरासरी 17,500 मैल प्रति तास या वेगाने सुमारे 250 मैलांवरून दर 90 मिनिटांनी पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते.  

हे इंटरनॅशल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जाऊन पुन्हा चंद्रापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी लागणारे अंतर एका दिवसात पार करते.

 

ISS म्हणजेच इंटरनॅशल स्पेस स्टेशन ज्या उंचीवर आहे तिथले गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 90% इतके मजबूत आहे

नासाने घोषणा केली की इंटरनॅशल स्पेस स्टेशनचे ऑपरेशन 2030 मध्ये संपेल आणि त्यानंतर ते पॅसिफिक महासागरात पडेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link