Jagannath Rath Yatra: पुरी जगन्नाथ मंदिराचे 7 रहस्य, ऐकून तुम्हालाही कानावर बसणार नाही विश्वास

Saurabh Talekar Sun, 07 Jul 2024-8:53 pm,

जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो. इथे ध्वज नेहमी तुम्हाला वाऱ्याच्या उलट्या दिशेने फिरताना दिसेल.

जगन्नाथ मंदिराच्या वर एक सुदर्शन चक्र देखील आहे. तुम्ही मंदिराच्या कोणत्याही बाजूला असला तरी दे सुदर्शन चक्र पूर्ण दिसतं.

जगन्नाथ मंदिराच्या शिखराची सावली नेहमीच अदृश्य राहते, अशी मान्यता आहे. कोणाही जमिनीवर या मंदिराच्या शिखराची सावली पाहिली नाही.

जेव्हा तुम्ही जगन्नाथ मंदिरात प्रवेश कराल तेव्हा बाजूलाच असलेल्या समुद्राचा आवाज देखील येत नाही. पण बाहेर आला की समुद्र खळवलाय की काय? असा प्रश्न पडेल.

जगन्नाथ मंदिराच्या शिखराचं आणखी एक रहस्य म्हणजे या शिखरावर एकही पक्षी बसलेला दिसत नाही. अनेकांसाठी हे देखील आश्चर्य आहे.

जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरातील प्रसादासाठी एकावर एक अशी सात भांडी ठेवली जातात आणि विशेष म्हणजे सर्वात आधी वरच्या भांड्यातील प्रसाद शिजतो.

जगन्नाथ मंदिराचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे जेव्हा मंदिर बंद करण्याची वेळ येते, तेव्हा प्रसादाचा एक कण देखील शिल्लक राहत नाही.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link