Diabetes : तुम्हालाही मधुमेह आहे? मग, आजपासूनच या फळाचं ज्यूस सुरु करा!

Sat, 14 Jan 2023-3:12 pm,

रेड ज्युस - 2 गाजर, 2 टोमॅटो आणि एक लहान आकाराची भोपळी मिरची आणि त्यामध्ये अर्धी वाटी खिसलेलं खोबरं मिसळा. या मिश्रणाचा ज्युस करा. न गाळता हा ज्युस पिणं अधिक फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक, मॅक्रो आणि मायक्रो मिनरल्स असतात. 

रेड ग्रीन कॉम्बिनेशन - 4 गाजरांसोबत 2 कप पालकाचा रस आणि मूठभर पार्सली किंवा पुदीन्याची पानं मिसळा. या स्मुदीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमीन बी 6, आयर्न, मिनरल्स मुबलक असतात यामुळे कोलेस्ट्रेरॉल व ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

स्पाईसी ज्युस - 4 गाजरं, 5 टोमॅटो, एक मूळा, लहानसा आल्याचा तुकडा, 2 मिरच्या यांची स्मुदी बनवा. ही स्मुदी न गाळता प्या. यामध्ये व्हिटॅमिनसोबत मिनरल्सदेखील आहेत. हिरव्या मिरच्या इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास आणि स्वादूपिंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

टॅन्जी ज्युस - मध्यम आकाराचा दूधी, चार भोपळ्या मिरच्या, सहा टोमॅटो यांचे एकत्र मिश्रण करा. याअम्ध्ये काळं मीठ, दालचिनीपूड, मिरपूड व हळद मिसळा. दूधी भोपळ्यमध्ये फायबर मुबलक असतात यामुळे वजन घटवण्यास मदत होते. सोबतच व्हिटॅमिन, आयर्न,पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक आढळते. तसेच अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मधूमेहींना हे ड्रिंक अधिक हेल्दी बनवण्यास मदत करते.

स्वीट ग्रीन ज्युस - एक काकडी, एक ग्रीन अ‍ॅप्पल, दोन वाट्या पालक आणि पाऊणवाटी कोथिंबीर किंवा पुदीना मिसळा. अर्धा इंच आलं आणि लिंबाचा रस मिसळा. हा आंबट गोड ज्युस हेल्दी ड्रिंक आहे. कमीत कमी कॅलरीयुक्त आणि व्हिटॅमिन, मिनरल्स यांचा मुबलक साठा असलेल्या ड्रिंकमध्ये सोल्युबल फायबर अधिक असते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link