कारगिल युद्धाचे `ते` 75 दिवस: पाकची घुसखोरी ते हकालपट्टी, कधी काय घडलं? येथे पाहा

Wed, 26 Jul 2023-6:19 am,

Kargil Vijay Diwas 2023 : 1999 मध्ये भारतीय लष्करानं पाकचा डाव उलटून लावला होता. जिथं शत्रूच्या 450 हून अधिक सैनिकांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. या युद्धाचा घटनाक्रम माहितीये? 

 

3 मे 1999 ला भारतीय लष्कराला पाकच्या घुसखोरीची माहिती मिळाली होती. पुढे 10 मे 1999 ला पारिस्ताननं द्रास, काकसार आणि मुशकोह या ठिकाणांवर घुसखोरी केली होती. 

26 मे 1999 ला भारतीय वायुदलानं यात महत्त्वाची भूमिका बजावत पाकनं घुसखोरी केलेल्या भागावर हवाई हल्ला चढवला. ज्यामध्ये अवंतीपूर, आदमपूर आणि श्रीनगर येथील वायुदलाच्या तळांवरून मिग 21, मिग 23, मिग 27, जॅग्वॉर अशा लढाऊ विमानांची मदत घेण्यात आली. 

5 जून 1999 ला भारतानं पाकिस्तानच्या घुसखोरीचे पुरावे सादर केले. त्यानंतर 10 जून 1999 ला पाकिस्ताननं कहर केला. विटंबना केलेले भारतीय जवानांचे मृतदेह त्यांनी लष्कराच्या ताब्यात दिले. सूत्रांच्या माहितीनुसार कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या तुकडीनं यात प्राण गमावले होते. 

 

13 जून 1999 ला याचं उत्तर देत भारतीय लष्करानं द्रासमधील तोलोलिंगचा ताबा घेतला. दोनच दिवसांत, 15 जून 1999 रोजी या युद्धात आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकच्या सैन्याला कारगिलमधील सैन्य मागे घेण्यास सांगितलं. 

संघर्ष धुमसत होता 4 जुलै 1999 ला तब्बल 11 तासांच्या लढाईनंतर भारतानं टायगर हिल ताब्यात घेतली आणि 5 जुलै 1999 ला भारताच्या जवानांनी द्रासचा ताबा घेतला. 

7 जुलै 1999 रोजी बाटालिक आणि 11 जुलै 1999 ला हळुहळू आणखी परिसर भारतीय लष्करानं ताब्यात घेतला. इथंच पाकिस्ताननं माघार घेण्यास सुरुवात केली. 

 

14 जुलै 1999 ला भारतीय लष्कराकडून ऑपरेशन विजयच्या यशाची अधिकृत घोषणा करण्यात आली. पुढे 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धाच्या समाप्तीची अधिकृत घोषणाही करण्यात आली. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link