वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले `King Charles III`; आईच्या आठवणीनं भावुक

गायत्री हसबनीस Sat, 06 May 2023-5:27 pm,

किंग चार्ल्स तिसरे यांचा भव्य राज्याभिषेक सोहळा आज 6 मे 2023 रोजी संपन्न झाला असून या सोहळ्या कुटुंबियांसह जगभरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. 

(Photo: @Coronation2023/Twitter)

किंग चार्ल्स व त्यांच्या पत्नी केमेला यांनी इंग्लंडचे राजा आणि राणी म्हणून घोषित करण्यात आले. वयाच्या 74 व्या वर्षी किंग चार्ल्स यांनी राजेपद स्विकारले. 

(Photo: @Coronation2023/Twitter)

यावेळी त्यांना हिऱ्यांचा मुकूट चढवण्यात आला. इंग्लंडच्या पारंपारिक राजेशाही पद्धतीनुसार किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळ्या पार पाडला. यावेळी मुकूट स्विकारताना ते भावूक झालेले दिसले. 

(Photo: @Coronation2023/Twitter)

आपल्या कुटुंबियांसह त्यांनी या सोहळ्यालाही उपस्थिती लावली होती. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन आणि नातवंडं उपस्थित होते. प्रिन्स हॅरी यावेळेस अनुपस्थित राहिलेले दिसले. 

(Photo: @Coronation2023/Twitter)

किंग चार्ल्स यांची पहिली पत्नी प्रिन्सेस डायना यांचा घटस्फोट झाला होता त्याच्या दुसऱ्या वर्षी 1997 मध्ये प्रिन्सेस डायना यांचे अपघाती निधन झाले होते. 

(Photo: @Coronation2023/Twitter)

प्रिन्सेस डायना हयात असताना त्या इंग्लंडच्या राणी होतील अशी इंग्लंडच्या जनतेला आणि त्यांच्या चाहत्यांना आशा होती. परंतु त्यांच्या निधनानं ती इच्छा अपूर्णच राहिली. 

(Photo: @Coronation2023/Twitter)

आज किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक होताना पाहून चाहत्यांना प्रिन्सेस डायना यांचीही आठवण आली आहे. त्याबद्दल व्यक्त होतं त्या सोशल मीडियावरून आपली भावना प्रकट केली आहे. 

(Photo: @Coronation2023/Twitter)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link