रामायणातील `किष्किन्धानगरी`चा दक्षिण भारताशी आहे जवळचा संबंध

Sat, 22 Jun 2024-5:13 pm,

प्राचीन मंदिरांचा वारसा लाभलेल्या याच हंपी शहराची रामायणात वेगळी ओळख देखील सांगितली आहे. 

हंपीमधल्या अंजनाद्री पर्वातावर हनुमानाचा जन्म झाल्याची कथा सांगितली जाते. या पर्वातावर देवी अंजनी, हनुमान आणि रामाचं मंदिर देखील आहे. 

अशी आख्यायिका सांगितली जाते की, रावणासोबतचं युद्ध जिंकण्यात वानरसेनेचा मोलाचा वाटा होता. रामाचा विजय झाल्यानंतर सीतेसोबत राम आणि वानरसेना अयोध्येकडे रवाना झाले. 

 

रावणाचा पराभव केल्यानंतर हनुमानाचा मोठा भाऊ सुग्रीव हा किष्किन्धा नगरीचा राजा म्हणून सिंहासनावर विराजमान झाला. 

 

त्याचबरोबर हनुमानाचा पुत्र अंगद हा किष्किन्धानगरीचा युवराज म्हणून ओळखला जाऊ लागला.

रावणाच्या लंकेवर निघण्यासाठी समुद्रावर सेतु तयार करण्यात नल-नील याने मोलाची कामगिरी बजावली होती. 

यानंतर नल-नील हा किष्किन्धानगरीचं मंत्रीपद सांभाळत होता.  रावणाचा पराभव केल्यानंतर किष्किन्धानगरीवर वानरसेना राज्य करत होती. 

रामायणातील ही किष्किन्धानगरी आज कर्नाटकातील हंपीच्या तुंगभद्रा नदीकिनारी वसलेली आहे. 

 

तुंगभद्रा नदी किनारी असलेल्या गुहा या वानरसेना आणि रामायणाची साक्ष देतात. निसर्गाचं वरदान लाभलेल्या हंपीला धार्मिक आणि पुरातन अवशेषांचा मोठा वारसा लाभला आहे.

 

असं म्हणतात की तुंगभद्रा नदीचं पुर्वीचं नाव हे पंपा असं होतं. या नदीच्या परिसरातील प्रदेश हा पुर्वी भास्कर क्षेत्र आणि किष्किन्धा म्हणून ओळखलं जात होतं. 

पंपा नदीचा अपभ्रंश करत त्याचं हंपी असं नामांतर करण्यात आलं. 

स्थापत्त्यकलेचा उत्तम उदाहरण म्हणजे हंपीमधील प्राचीन मंदिरं आहेत. 14 व्या शतकात विजयनगर साम्राज्याची हंपी शहर राजधानी होती.

विजयनगर साम्राज्यात हंपी शहर हे शेती,व्यापार आणि देवीदेवळांच्या मंदिरांनी समृद्ध होते, इतिहासात सांगितलं जातं.  

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link