अरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा `हे` उपाय

Tue, 08 Aug 2023-6:27 pm,

आपण नवीन कपडे आणले की सर्वप्रथम ते धुण्याला प्राधान्य देतो. बऱ्याचदा हे नवे कपडे वेगळेच पाण्यात ठेवले जातात. 

 

कधीकधी अजाणतेपणानं रोजच्या कपड्यांमध्येच हे कपडेही टाकले जातात आणि मग पुढं खऱ्या अर्थानं रंगाचा बेरंग होतो. कारण, काही कळायच्या आतच एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलेला असतो. 

 

बरं, कपड्यांमध्ये एखादा पांढरा शर्ट, एखादी साडी, नवी ओढणी असे काही कपडे असतील तर मग रंग लागल्यामुळं हे कपडे कुठेही वापरण्याजोगे राहत नाहीत. शेवटी त्यांचे फडके, पडदे, उशीचे कव्हर बनवण्यावाचून कोणताच पर्याय उरत नाही. 

 

थोडक्यात काय, तर सर्व कपडे एकत्र धुवू नयेत. असं केल्यास आणि कपड्यांचे रंग एकमेकांना लागल्यास गोंधळून जाऊ नका. कारण काही सोपे उपाय करून तुम्ही कपडे पूर्ववत करू शकता. 

कपड्यांवर लागलेले डाग घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस आणि एक लीटर पाणी असं मिश्रण तयार करा. यानंतर डाग लागलेले कपडे यामध्ये 20 मिनिटांसाठी भिजवा आणि हलक्या हातानं हे डाग घासून स्वच्छ करा. 

 

कपड्यांवर लागलेल्या रंगीत डागांना मिटवण्यासाठी तुम्ही रबिंग अल्कोहोलचाही वापर करु शकता. बाजारात तुम्हाला हे सहजपणे मिळू शकेल. यासाठी डागांवर दोन चमचे रबिंग अल्कोहोल व्यवस्थित लावा आणि दहा मिनिटं ब्रशनं हलक्या हातानं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. डाग निघून जातात कपडे स्वच्छ पाण्यात धुवून सूर्यप्रकाशात वाळवा. 

 

कपड्यांवर लागलेले डाग मिटवण्यासाठी वापरात येणारा आणखी एक घटक म्हणजे हायड्रोजन पॅरोक्साइड. या रसायनाच्या वापरामुळं कापडही खराब होत नाही. यासाठी एक लीटर पाणी गरम करून त्यामध्ये 1 ते 2 चमचे हायड्रोजन पॅरोक्साइड मिसळा आणि कपड्याचा डाग असणारा भाग या मिश्रणात भिजवा. पाणी थंड होताच हा डाग कपड्यांच्या ब्रशनं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link