PHOTO : विवाहित खेळाडूच्या पडली प्रेमात, 22 व्या वर्षी रचला इतिहास, अक्षय कुमारमुळे वाचले प्राण

Tue, 16 Apr 2024-9:20 am,

उत्तर प्रदेशातील या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून आज ब्रेक घेतला असला तरी, तिच्या अभिनयाने एकेकाळी चाहत्यांना घायाळ केलं होतं. 

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने वयाच्या 22 व्या वर्षी इतिहास रचला होता. 2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला. आता तुम्हाला कळलं असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. 

लारा दत्ता हिचा आज 46 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आयुष्यातील काही घटनांवर आपण नजर टाकणार आहोत. लाराचा जन्म हा उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पंजाबी हिंदू कुटुंबात झाला. 

मिस युनिव्हर्स झाल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अंदाज या चित्रपटातून एन्ट्री केली. यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. फिल्मफेअरसोबतच लाराला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

पहिल्या चित्रपटाच्या वेळी शूटिंगदरम्यान अक्षय कुमार याने लाराचा जीव वाचवला. मीडिया रिपोर्टनुसार अंदाज चित्रपटातील रब्बा इश्क ना होवे या गाण्याची शूटिंग आफ्रिकेत सुरु होती. ही शूटिंग समुद्र किनारी असल्याने लारा घाबरली होती. कारण तिला पाण्याची भीती वाटते. 

शूटिंगदरम्यान समुद्रात मोठी लाट आली आणि तिचा तोल गेला. ती लाटांसह वाहू लागली हे पाहून सर्वजण घाबरले. ते पाहून अक्षय कुमारने समुद्रात उडी मारली आणि तिचा जीव वाचविला. 

लारा दत्ताने टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न करुन सगळ्यांना धक्काच दिला. लारा आणि भूपती जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा भूपतीचं लग्न झालं होतं. 

महेश भूपती पहिल्याच नजरेतच लाराच्या प्रेमात पडला होता. त्याने श्वेता जयशंकरला घटस्फोट दिला आणि 2011 मध्ये लारा दत्ताशी लग्न केलं. त्यांना सायरा नावाची मुलगी आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link