TVS Star City Plus चं नवं मॉडल लॉन्च, इतकी आहे किंमत

Tue, 02 Mar 2021-7:32 pm,

टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star City Plus) चा नवा मॉडल लॉन्च झाला आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, नव्या मॉडलमध्ये आधीपेक्षाही अधिक चांगले फीचर्स आहेत आणि त्याचा टॉप स्पीड ९० किलोमीटर प्रति तास इतका आहे. या शिवाय कंपनीने स्पष्ट केलं आहे, की या मॉडलचा मायलेज देखील उत्तम आहे.

देशातील प्रमुख टू व्हीलर कंपनी Star City Plus ने नवं मॉडल लॉन्च केलं आहे. टीव्हीएसचं नवं मॉडल बघायला खुपच आकर्षक आहे. या मध्ये USB मोबाईल चार्जरही देण्यात आला आहे. याचा अर्थ आपण ड्राइविंग करत असताना आपला मोबाईल चार्ज करू शकतो.

कंपनीने दावा केला आहे की, या मॉडलचा लूक खुप सुंदर आहे. कंपनीच्या मते, नव्या मॉडलमध्ये नवं तंत्र वापरलं गेलं आहे. ज्यामुळे गाडी चांगलं मायलेज देईल. पेट्रोलच्या किंमती वाढत असताना याचा ग्राहकांना फायदा होईल.

स्टार सिटी प्लस 2021 एडिशनमध्ये 110 cc, सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. इंजिन सोबत 4-स्पीड गियरबॉक्स पण दिला गेला आहे. या बाइकची टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नव्या स्टार सिटी प्लस ही बाईक रेड-ब्लॅक डुअल-टोन कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स शोरूम किंमत 65,685 रुपये असून ती जुण्या मॉडल पेक्षा 2600 रुपयांनी महाग आहे. नव्या मॉडेलमध्ये देण्यात आलेल्या फीचर्सच्यानुसार त्याची किंमत बरीच कमी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link