Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Tue, 18 Apr 2023-9:31 am,

राज्यातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, नागरिकांनी त्यांचं पालन करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. 

 

लिंबू सरबत, नारळ पाणी, ताक अशा पेयांसोबतच दर दिवशी पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे. 

 

पांढऱ्या किंवा सौम्य रंगाचे कपडे वापरण्यासोबतच सैलसर कपडे वापरा असा सल्लाही नागरिकांना देण्यात आला आहे. 

 

दिवसा घराबाहेर पडत असल्यास डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल बांधून निघण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. 

 

सकाळी 10 वाजण्याच्या आधी किंवा सायंकाळी 4 वाजल्यानंतरच महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं असून, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चहा, कॉफी, शीतपेयं टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 

 

स्नायूंना गोळे आल्यास, भरपूर घाम आल्यास, थकवा किंवा भोवळ आल्यासारखं जाणवल्यास वैद्यकिय सल्ला घ्या असंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

 

सूर्याची दाहकता पाहता उष्माघाताचे परिणाम कमी करण्यासाठी काही सोपे उपायही तुम्ही अवलंबात आणू शकता. यामध्ये तुम्हाला आवळा, गुलकंद या सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांची मदत होईल. अॅपल व्हिनेगर, बेलफळाचा रस हे पदार्थ या दिवसांत तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करतील. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link