Mahindra Thar च्या 5 door मॉडेलचा फर्स्ट लूक पाहून कारप्रेमी क्लिनबोल्ड; तुम्हीही फिचर्स पाहून घ्या

Thu, 17 Aug 2023-2:44 pm,

Mahindra Thar e चा First Look नुकताच सर्वांच्या भेटीला आला आहे. या कारमध्ये नेमके काय फिचर्स आहेत हे एकदा पाहूनच घ्या. कारण, या कारची पहिलीच झलक पाहून सर्वजण घायाळ झाले आहेत. 

 

पहिली बाब म्हणजे ही नवी थार सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या थारसारखी नाहीये. INGLO प्लॅटफॉर्मवर या कारची निर्मिती करण्यात आली आहे. इलेक्ट्रीकल रेंजमध्येही ही कार अतिशय फ्लेक्जिबल आहे. 

 

इथून पुढं Thar.e हे मॉडेल लॅडर फ्रेम एसयुव्ही नसून एक ऑन व्हील ड्राईव्ह आणि डबल मोटर लेआऊटसोबत बाजारात येणार आहे. कारमध्ये असणारी इलेक्ट्रीक मोटर तिला टॉर्क देण्यात यशस्वी ठरेल. 

 

साधारण एखाद्या बॉक्सप्रमाणं दिसणारी ही कार आयताकृती असल्याचं पाहताक्षणी लक्षात येतं. नवी एलईडी लाईट, ग्रिल आणि पाच दरवाजांसह ही थार पूर्णत: नव्या रुपात पाहायला मिळतेय. 

 

अद्ययावत तंत्रज्ञानासह या कारमध्ये असंख्य इंटीरियर फिचर्स देण्यात आले आहेत. शाश्वत विकास केंद्रस्थानी ठेवत या कारच्या निर्मितीसाठी अनेक प्रकारचं रिसाइकिल्ड मटेरियल वापरण्यात आलं आहे. 

 

फर्स्ट लूक लाँच झालं असलं तरीही थारचं हे मॉडेल इतक्यात बाजारात येणार नाहीये. 2027 पर्यंत ते विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळं ही कार घ्यायची असेल तर आतापासूनच Saving सुरु करा. 

 

कारण अद्वितीय ड्रायव्हिंगचा अनुभव देणारी अशी 'थार' पुन्हा होणे नाही. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link