7 एकरवर धोनीचं अलिशान फार्म हाऊस `कैलाशपती`

Wed, 30 May 2018-4:40 pm,

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यश आणि लोकप्रियतेच्या बाबतीत उंच स्थानावर आहे. आयपीएल 2018 मध्ये 2 वर्षाच्या बंदीनंतर ही चेन्नईने त्याच्या नेतृत्वात फायनल जिंकली. धोनीचं हे घर सात एकरवर बनलं आहे.

महेंद्र सिंह धोनीचं हे फार्म हाउस इतकं सुंदर आहे की कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. धोनी नेहमी या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवतो.

आज महेंद्र सिंह धोनी देशात सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. जाहिरातींच्या दुनियेत धोनी महागडा बँड आहे. रांचीच्या रिंग रोडवर धोनीचं हे शानदार 'कैलाशपती' फार्म हाउस आहे. 

धोनीचं हे भव्य फार्म हाउस बनवण्यासाठी 3 वर्ष लागले. पर्यावरणाविषयी धोनीचं प्रेम या फार्म हाऊसमधून दिसतं. 'कैलाशपती'मध्ये प्रत्येक गोष्ट भव्य आणि शाही आहे.

धोनीच्या या फार्म हाउसमध्ये इंडोर स्टेडियम देखील आहे. स्वीमिंग पूल, नेट प्रॅक्टिसिंग मैदान, अल्ट्रा मार्डन जिम देखील आहे. हा फार्म हाउस धोनीच्या हरमू रोडवर बनलेल्या घरापासून 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. याआधी धोनी लहानपणी एका छोट्याच्या चाळीत राहत होता.

महेंद्र सिंह धोनीने क्रिकेटमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर जुनं घर सोडून 2009 मध्ये हरमू रोडवर तीन माळ्यांचं घर खरेदी केलं होतं. येथे धोनी 8 वर्ष राहिला. 2017 मध्ये तो या कैलाशपती फार्म हाउसमध्ये शिफ्ट झाला.

धोनीच्या फार्म हाउसमध्ये वेगवेगळे झाडे आहेत. धोनीने त्याच्या फार्म हाऊसमध्ये एक खास पार्किंग देखील बनवली आहे. त्याच्याकडे अनेक कार आणि बाईक्स आहेत. 

 

धोनीच्या संपूर्ण फार्म हाउसमध्ये सुंदर फर्निचर आहे. धोनीच्या फार्महाऊसमध्ये त्याचे फेव्हरेट पेट्स असलेले कुत्रे दिसतात. धोनी याच फार्म हाऊसमध्ये त्यांना ट्रेनिंगही देतो.

महेंद्र सिंह धोनीने एका छोट्याश्या घरातून आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती. पण आज तो जगातील काही श्रीमंत खेळाडूंच्या यादीत येतो. 2004 मध्ये त्याने क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं.

14 वर्षांपासून भारतासाठी खेळणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आजही तितकाच फीट आहे. आयपीएलमध्ये देखील त्याने ते स्पष्ट केलंय. धोनीची बॅटींग आणि विकेटकीपिंग हे संपूर्ण जगात चर्चेचा विषय असते.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link