मुकेश अंबानींनी ऑर्डर देऊन बनवल्या 2 Bikes, जाणून घ्या काय आहे कारण

Thu, 12 Apr 2018-7:45 pm,

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या ताफ्यात आणखीन दोन बाईक्स जोडल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडून पोलिसांना दोन बाईक देण्यात येणार आहेत. या दोन कस्टम बिल्ड बाईक सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना देण्यात येणार आहेत. रॉयल एनफिल्ड बुलेट इलेक्ट्राला रोड रेज कस्टम बिल्ड्सने कस्टमाईज करुन बनवलं आहे. मुकेश अंबानी यांच्याकडून मागवण्यात आलेल्या या दोन्ही बाईक्स पोलिसांना देण्यात येणार आहेत. हे पोलीस मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेचा भाग असणार आहेत.

ऑटो वेबसाईट ड्राईव्हस्पार्कच्या मते, अंबानी याच्या द्वारे देण्यात आलेल्या ऑर्डरच्या आधारे बनवण्यात आलेल्या या बाईक्स पोलिसांना देण्यात येणार आहेत. रॉयल इनफिल्ड बुलेट इलेक्ट्राला कस्टमाईज करुन बनवलं आहे. (फोटो सौजन्य: ड्राईव्हस्पार्क)

या मोटरसायकल्सच्या फ्रंट साईडला प्रोटेक्‍टि‍व वि‍जर लावण्यात आले आहेत. याचा उपयोग बाईकस्वाराला पुर्ण संरक्षण देण्यास होणार आहे. बाईकच्या मागे पॅनीयर्स लावण्यात आले आहेत. यासोबतच अॅडिशनल स्‍टोरेजसाठी टॉप बॉक्‍स लावण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: ड्राईव्हस्पार्क)

या दोन्ही बाईक्सला ऑफ-व्हाईट कलर देण्यात आला आहे. तसेच निळ्या-पिवळ्या चेक स्‍ट्रि‍प आहेत. दोन्ही बाईक्सवर पोलीस लिहिण्यात आलं आहे. तर, पुढील आणि मागच्या बाजुला बीअन (लाइट्स) लावण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य: ड्राईव्हस्पार्क)

रिपोर्ट्सनुसार, देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिकांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. या कॅटेगरीत एकूण 22 सुरक्षारक्षक असतात ज्यामध्ये पोलीस आणि चार ते पाच एनएसजी कमांडोंचा समावेश असतो. (फोटो सौजन्य: ड्राईव्हस्पार्क)

मुकेश अंबानी यांच्याकडे दोन बुलेटप्रूफ कारही आहेत. ज्यापैकी एक आर्मड BMW 760Li आणि दुसरी मर्सडिज बेंज S660 या दोन कारचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: ड्राईव्हस्पार्क)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link