महाराष्ट्रातील `हे` चमत्कारी शिवमंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं, पंचवटीशी आहे खास नातं

नेहा चौधरी Wed, 26 Jun 2024-3:08 pm,

भाविकांनुसार जगात या शिव मंदिरासारखं दुसरं मंदिर नाही. हे मंदिर अद्वितीय वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर दिसणारे दोन नंदी बैल आणि मंदिरात प्रवेशासाठी तीन मुखमंडप 

हे मंदिर हे मुंबईजवळील अंबरनाथमध्ये. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभामंडपाच्या जवळ गेल्यावर तुम्हाला 9 पायऱ्या उतरल्यावर गर्भगृह दिसेल. मंदिरात आत गेल्यावर शिवलिंग त्रिमस्ती असून गुघड्यावर एक स्त्री विराजमान आहे. याला शिव पार्वतीचं रुप मानलं जातं. 

अंबरनाथचं हे शिव मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. वालधन नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडांनी वेढलेले पाहिला मिळतं. या मंदिरातील गर्भगृहात एक गरम पाण्याचं तळही आहे. या मंदिराच एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक गुहा देखील आहे. असं म्हणतात की, या गुहातून पंचवटीला मार्ग जातो. 

विशेष म्हणजे अंबरनाथ शिव मंदिराला युनेस्कोने सांस्कृतिक वारसा घोषित केलंय. त्यामुळे इथे देशविदेशातील लोक या मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरातील भिंतीवर शंकराचे अनेक रुपे कोरल्याची पाहिला मिळतात. त्यासोबतच गणेश, कार्तिकेय, चंडिका या देव देवतांचे मूर्तीही तुम्हाला आकर्षित करतात. 

या मंदिराविषयी अशी मान्यता आहे की, पांडवांनी वनवासात असताना हे मंदिर एका रात्रीत बांधले होते. पण कौरवांच्या भीतीने पांडवांनी अंबरनाथमधून प्रस्तान केलं. त्यामुळे या मंदिराचं काम पूर्ण होऊ शकलं नव्हतं, असं म्हटलं जातं. 

तर पौराणिक मान्यतेनुसार या मंदिरात ब्रह्मदेवाच्या किमान 8 मूर्ती पाहिला मिळतात. शिवरात्रीला इथे मोठी जत्रा असते जी तीन ते चार दिवस असते. 

अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून हे मंदिर सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात सगळीकडून नियमित बसेही जातात. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link