प्रत्येक फ्लॅट म्हणजे एक बंगला... `अँटिलिया` किंवा CSMT ही नाही, तर मुंबईतील `या` इमारतीचं Architecture सर्वोत्तम

Tue, 27 Aug 2024-2:03 pm,

Mumabi News : मुंबई.... सात बेटांना मिळून, जोडून तयार करण्यात आलेलं एक असं शहर ज्याचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय झपाट्यानं बदलला. गगनचुंबी इमारतींनी शहरातील चाळींची जागा घेतली. 

बैठी वस्ती जाऊन जिथंतिथं सदनिका उभ्या राहिल्या. काही इमारती तर, जणू पत्त्यांच्या बंगल्यासारख्या बांधण्यात आल्या. तर, काही इमारतींची उंची आता थांबता थांबत नसून, मजल्यावर मजले वाढवण्याचं काम सुरूच आहे. 

अशा या मुंबई शहरामध्ये एक अशीही इमारत आहे जी खऱ्या अर्थानं शहरातील उत्तम स्थापत्यशास्त्र आणि बांधकामाच्या आधुनिक तंत्रांचा नमुना ठरत आहे. 

1983 मध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीला 28 मजले असून, तिचं बांधकाम इतकं कमाल आहे की इथून सूर्योदय, सूर्यास्त आणि समुद्राचाही सुरेख नजारा पाहायला मिळतं. 

जगप्रसिद्ध स्थापत्यशास्त्र अभ्यासक Charles Correa यांनी या इमारतीचा आराखडा तार केला असून, सातत्यानं वेग धरणाऱ्या शहरीकरणाला अनुसरूनच या इमारतीची आखणी आणि बांधणी करण्यात आली आहे. जुन्या काळातील काही संदर्भ आणि आधुनिकतेची गरज ओळखत या इमारतीतील घरं उभारण्यात आली. 

 

दक्षिण पश्चिम मुंबईत अतिशय दिमाखात उभ्या असणाऱ्या या इमारतीचं नाव आहे कंचनजंगा. इमारतीमध्ये असणारी घरं पाहिलं असता त्यांची प्राथमिक बांधणी एखाद्या बंगल्याप्रमाणं असून, प्रत्येक घराला बफर झोन असून त्याचा वापर इथं बागेच्या किंवा व्हरांड्याच्या स्वरुपातही करण्यात येतं. 

सिमेंट काँक्रिट आणि स्टीलचा वापर करून उभारण्यात आलेल्या या इमारतीला खालून पाहिलं असता तिची सुरेख रचना लक्ष वेधताना दिसते. अशी ही इमारत मुंबई शहरात अंबानींच्या अँटिलियाआधीपासूनच तिचं वेगळेपण जपताना दिसत आहे. कमाल आहे ना.... 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link