दूधविक्रेत्याला 32 वर्षांनी कोर्टाने सुनावली शिक्षा; प्रकरण आणि शिक्षा वाचून बसेल धक्का

Sat, 21 Jan 2023-3:00 pm,

या प्रकरणामध्ये अखेर 19 जानेवारी 2023 रोजी शिक्षा सुनावली. न्यायालयाने तब्बल 32 वर्षानंतर निकाल देताना आरोपीला दोषी ठरवत सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

खाद्य निरीक्षक सुरेश चंद यांनी या प्रकरणामध्ये 21 एप्रिल 1990 रोजी या दूधविक्रेत्याविरोधात न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणावर मागील 32 वर्षांपासून सुनावणी सुरु होती. वेळेवेळी प्रकरण पुढे ढकललं जात होतं.

या प्रकरणातील सरकारी अधिकारी रामावतार सिंह यांनी शुक्रवारी पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार दूधविक्रेता हरबीर सिंहला भेसळयुक्त दूध विकताना रंगेहाथ पकडलं. या दूधाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. या तपासणीमध्ये दूध भेसळयुक्त असल्याचं स्पष्ट झालं.

अप्पर मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुमार यांनी गुरुवारी दूधविक्रेता हरबीर सिंहला या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे. या व्यक्तीला आर्थिक दंड ठोठावण्याबरोबरच तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली आहे.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर (muzaffarnagar) जिल्ह्यातील कोर्टात भेसळयुक्त दूध विकल्या प्रकरणातील सुनावणी झाली. मागील 32 वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणामध्ये अखेर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link